शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ जंगली हत्तींच्या वास्तव्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरणाचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2021 05:00 IST

जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : जिल्ह्यात छत्तीसगडमार्गे दाखल झालेल्या २१ जंगली हत्तींच्या कळपासाठी चपराळा अभयारण्यात पुरेसे खाद्य मिळणार नाही. त्यांच्यासाठी भामरागड किंवा सिरोंचा परिसरातील जंगल अधिक पोषक राहू शकते. असे असले तरी चपराळातही गवत, पाणी अशा सुविधा वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी भूमिका घेऊन वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी यावर चर्चा केली. राज्याचे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात चपराळा येथील वन विभागाच्या विश्रामगृहावर आढावा घेतला. जिल्ह्यात मागील महिनाभरापासून जंगली हत्तींचे वास्तव्य आहे. या हत्तींकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ नये, तसेच हत्तींना आवश्यक वातावरण असलेली जागा तयार करण्याच्या अनुषंगाने चपराळा येथील अभयारण्याचा विचार होऊ शकतो का? याबाबतची पडताळणी वन विभाग व प्रशासनाकडून करण्यात आली. चपराळा येथे हत्तींच्या नैसर्गिक निवासाबाबत जागा तयार करावयाची असल्यास काय-काय उपाययोजना कराव्या लागतील, याबाबतचे पॉवर पॉईंट सादरीकरण पालकमंत्र्यांसमोर गडचिरोलीचे उपवनसंरक्षक एस. आर. कुमारस्वामी यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीना, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, एएसपी अनुज तारे, आलापल्लीचे उपवनसंरक्षक सी. आर. तांबे, उपविभागीय वन अधिकारी राहुल शितोलिया, चौडमपल्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश लांडगे, क्षेत्र सहायक एम. पोतगंटावार व वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी वन विभागाने हत्तींच्या वास्तव्याचा सविस्तर अभ्यास करण्याचे निर्देश  पालकमंत्र्यांनी  दिले. यावेळी शिवसेनेचे किशाेर पाेतदार व सुरेंद्रसिंह चंदेल उपस्थित हाेते.

हत्तींची दिवसा भटकंती, रात्री आराम-    वनसंरक्षक किशोर मानकर यांनी यावेळी हत्तींबाबतची सद्यस्थिती सांगितली. सध्या तो कळप धानोरा तालुक्यातील जंगलात सुरक्षित आहे. या कळपात पिलूही असल्यामुळे कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास हे हत्ती आक्रमक होतात, असे सांगितले. हे सर्व हत्ती सकाळी ७.३० वाजता जंगलात निघून जाऊन सायंकाळी ६ च्या सुमारास परत येत आहेत. त्यांना जंगलातील तलावामध्ये पाण्याची सोयही असल्यामुळे त्याठिकाणी त्यांचा मुक्काम आहे. परंतु, उन्हाळ्यात त्याठिकाणी हत्तींना पाणी मिळणार नसल्यामुळे ते खालच्या भागात भामरागडकडे जाऊ शकतात, अशी माहिती यावेळी पालकमंत्र्यांना देण्यात आली.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग