शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तमधून जिल्हा वगळणे लोकप्रतिनिधींचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 00:01 IST

पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देविजय वडेट्टीवार यांचा आरोप : पाणीपातळी एक मीटरने खालावली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पाण्याअभावी जिल्हाभरातील पिके करपली आहेत. पाण्याची पातळी मागील वर्षीच्या तुलनेत एका मीटरने खाली गेली आहे. तरीही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाला नाही. याला येथील लोकप्रतिनिधी व भाजपाचे सरकार जबाबदार आहे, असा आरोप आ.विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.मागील वर्षीच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात पर्जन्यमान कमी झाले आहे. पोळ्यानंतर पावसाने कायमची दडी मारली. त्यामुळे सिंचनाची सुविधा नसलेले धानपीक करपले. त्याचबरोबर कापूस, सोयाबीन पिकालाही फटका बसला. जिल्हाभरात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. एटापल्ली, भामरागड, कोरची, कुरखेडा या तालुक्यांमध्ये भयावह स्थिती असून धान लागवडीचा खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे. इतरही तालुक्यातील धानपीक करपले आहे. अशी विपरित परिस्थिती असतानाही गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आला नाही. कर्मचाऱ्यांच्या मार्फत सर्वे केला जातो. त्यावेळी त्यांना योग्य सर्वे करण्याचे निर्देश देणे व त्यावर नियंत्रण ठेवणे ही लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले. यावरून ते जनतेप्रती गंभीर नसल्याचे दिसून येते. त्यांची बांधिलकी जनतेशी नसून मतांशी आहे. राज्यभरात १५४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. मात्र गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका नाही. अतिशय गंभीर बाब आहे.लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, चिमूर, नागभिड, सिंदेवाही हे तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाले. हा भाग सुद्धा धानाचा पट्टा आहे. जेव्हा ही तालुके दुष्काळग्रस्त घोषित झाली तर गडचिरोली जिल्ह्यातील एकही तालुका का नाही, असा प्रश्न उपस्थित केला. मागील वर्षी मावा, तुडतुडा रोगाने हजारो हेक्टरवरील धानपीक उद्ध्वस्त झाले. या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदत मिळाली नाही. ज्यांना मदत मिळाली, ती अतिशय कमी आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड.राम मेश्राम, काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, डॉ.नितीन कोडवते, कुणाल पेंदोरकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवार