शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
2
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
3
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
4
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
5
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
6
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
7
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
8
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
9
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
10
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
11
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
12
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
13
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
14
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
15
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
16
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
17
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
18
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
19
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
20
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”

अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर नागरिकांची गैरसोय

By admin | Updated: July 16, 2015 01:59 IST

येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या महाआॅनलाईन सेतू केंद्रातील आधार कार्ड केंद्रात नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने गैरसोय होत आहे.

प्रचंड गर्दी : प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्षअहेरी : येथील तहसील कार्यालयासमोर असलेल्या महाआॅनलाईन सेतू केंद्रातील आधार कार्ड केंद्रात नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने गैरसोय होत आहे. आधार कार्ड केंद्र संचालकाकडून पिण्याचे पाणी व प्रवेशद्वारासमोर छताची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनाही कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी आधार कार्ड आवश्यक केले आहे. तसेच विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. शिवाय बचत बँक खाते, गॅस सिलिंडर कनेक्शनसाठी आधार कार्ड लिंकिंग करणे आवश्यक आहे. आधार कार्डचे दिवसेंदिवस महत्त्व वाढत असल्याने नागरिक आधार कार्डाची नोंदणी करण्यासाठी अहेरीतील एकमेव आधार कार्ड केंद्रावर गेल्या अनेक दिवसांपासून गर्दी करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)शासनाने आता सर्व शाळांची माहिती सरल या आॅनलाईन प्रणालीत संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड क्रमांक आवश्यक केल्याने तालुक्यातील बहुतांश गावातील पालक आपल्या पाल्यांना घेऊन आधार कार्ड नोंदणीसाठी अहेरीच्या केंद्रावर गर्दी करीत आहेत. गर्दीमुळे शाळकरी मुलांना दिवसभर केंद्राच्या प्रवेशद्वारासमोर उन्हात प्रतीक्षा करावी लागत असल्याने शाळकरी मुलांना प्रचंड त्रास होत आहे.मोठ्या गावात नोंदणी केंद्र द्याअहेरी तालुक्यात गावांची संख्या मोठी असून भौगोलिक क्षेत्रही मोठे आहे. अहेरी शहर वगळून तालुक्यात इतर कोणत्याही गावात आधार कार्ड केंद्र नसल्याने संपूर्ण तालुक्यातील नागरिक अहेरीच्या आधार कार्ड केंद्रावर गर्दी करीत आहेत. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने पेरमिली, जिलमगट्टा, कमलापूर, बोरी, देवलमरी या मोठ्या गावांमध्ये आधार कार्ड नोंदणी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आहे.