शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

डांबरी रस्ते झाले मातीमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 22:18 IST

मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत.

ठळक मुद्देसिरोंचा तालुक्यातील स्थिती : रस्त्यावरील डांबर उखडले

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांची दुरूस्ती झाली नसल्याने सिरोंचा तालुक्यातील मुख्य मार्गासह ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या मार्गांची बकाल अवस्था झाली आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णपणे निघून गेल्याने रस्ते खडीकरणाप्रमाणे झाले आहेत. मार्गांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत असताना शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष झाले आहे.सिरोंचा तालुक्यातील बहुतांश भाग हा नक्षलग्रस्त व आदिवासी बहूल आहे. या तालुक्यातील सागवान प्रसिध्द आहे. जंगलाच्या माध्यमातून शासनाला शेकडो कोटी रूपयांचा महसूल उपलब्ध होते. मात्र या तालुक्याच्या विकासाकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गावांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. सिरोंचा हे तालुका स्थळ आहे. मात्र याही शहराचा विकास रखडला आहे. सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर करण्यात आले. त्यामुळे शहराचा विकास झपाट्याने होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत होता. मात्र यापेक्षा फोल ठरली आहे.सिरोंचा शहराचा पाहिजे त्या प्रमाणात विकास झाला नाही. मुख्य मार्गावरच्या खड्ड्यांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला आहे. खड्ड्यांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे की, खड्डा चुकविणे अशक्य झाले नाही. पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून राहत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. बाजुला एखादे वाहन गेल्यानंतर त्या वाहनाचे पाणी बाजुच्या व्यक्तीवर उडत असल्याने वाहन चालविणेही कठीण होत होते.मुख्य मार्गांचीही दशा कायमसिरोंचा तालुक्यातून ६३ क्रमांकाचा राष्ट्रीय महामार्ग जातो. मात्र या महामार्गावरून मोठ्या प्रमाणात तेलंगणा राज्यातील ट्रक चालत असल्याने या मार्गाची दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अशीच अवस्था सिरोंचा-आलापल्ली या १०० किमी मार्गाची आहे. जिल्ह्यातील हा मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून रात्रंदिवस वाहनांची वर्दळ राहते. मात्र याही मार्गाच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. शेकडो वाहनधारकांना जीव मुठीत घालून प्रवास करावे लागते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक