शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळांमध्ये पुन्हा डिजिटल हजेरी

By admin | Updated: June 23, 2017 00:47 IST

गडचिरोली : जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी

जुन्या बंद : नवीन बायोमेट्रिक मशिन्समुळे शिक्षकांच्या दांडीला बसणार लगामलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली : जिल्ह्याच्या पाच तालुक्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांच्या हजेरीची नोंद ठेवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन लावल्या होत्या. परंतू त्यांची वॉरंटी संपताच त्या बंद पडल्या. त्यामुळे स्थानिक स्तरावर चांगल्या मशिन्स खरेदी करून पुन्हा डिजीटल हजेरी सुरू केली जाणार आहे.जिल्ह्याच्या दुर्गम भागात असलेल्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक नियमित हजर राहात नसल्याच्या तक्रारी पालकांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून मुंबईपर्यंत करण्यात आल्या होत्या. त्यातून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. त्यामुळे आदिवासी विकास विभागाने सर्व शासकीय आश्रमशाळांध्ये शिक्षकांच्या येण्या-जाण्याच्या नोंदी ठेवण्यासाठी बायोमेट्रिक मशिन लावण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी नाशिक आयुक्त कार्यालयातूनच सर्व मशिन खरेदी करून त्या जिल्ह्याजिल्ह्यात पाठविल्या होत्या. गडचिरोलीसाठी आलेल्या मशिनची खरेदी २०१२ मध्येच झालेली असताना त्या मशिन गडचिरोलीत पोहोचून संबंधित आश्रमशाळांमध्ये बसविण्यासाठी १ ते २ वर्षे लागली. २०१४ मध्ये सर्व शासकीय आश्रमशाळांध्ये थम मशिन लागल्या होत्या. मात्र अवघ्या दोन वर्षात म्हणजे डिसेंबर २०१६ मध्ये एक-एक करीत सर्व मशिन बंद पडल्या. त्यानंतर शिक्षकांची हजेरी जुन्याच पद्धतीने घेणे सुरू झाले. नाशिक येथून आलेल्या त्या बायोमेट्रिक मशिनची वॉरंटी ३ वर्षाचीच होती. ती २०१५ मध्ये संपली. त्यामुळे वॉरंटीचा काळ संपल्यानंतर संबंधित कंपनीने त्या मशिन विनाशुल्क दुरूस्त करण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत आता चांगल्या दर्जाच्या मशिन खरेदी करून त्या सर्व शासकीय आश्रमशाळांमध्ये लावण्याचा विचार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून केला जात आहे.