शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पूल बांधकामामुळे अडचणी वाढल्या

By admin | Updated: August 8, 2015 01:34 IST

चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर ...

प्रशासनाचे दुर्लक्ष : कडुली नाल्यावरील पूल धोकादायकतळोधी (मो.) : चामोर्शी तालुक्यातील तळोधीचे बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्यावर कंत्राटदाराने केवळ ५० मीटरच्या अंतरावर सिमेंट पायल्या टाकून कच्चा पूल उभारला आहे. सदर पूल अर्धवट असल्याने या मार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी अर्धवट पूलामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तळोधी बसस्थानक ते कडुली वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नाल्यावर पूल नसल्यामुळे या भागातील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना प्रचंड अडचण जाणवत होती. या ठिकाणी पुलाची मागणी सातत्याने करण्यात आल्यानंतर प्रशासनाने या ठिकाणी पुलाचे बांधकाम मंजूर केले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे सोपविले. उन्हाळ्यात संबंधित कंत्राटदाराने या ठिकाणी केवळ ५० मीटर अंतरावर सिमेंटच्या सहा पायल्या टाकून पुलाचे अर्धवट काम केले. या ठिकाणी आणखी दीडशे मीटर अंतरापर्यंत पूल होणे आवश्यक आहे. तेव्हाच या मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते. संबंधित कंत्राटदाराने पुलाच्या अग्रभागी गोटा पिचिंग न केल्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. वैनगंगा नदीघाटावरील स्मशानभूमीत प्रेत दफनविधीसाठी याच मार्गाचा उपयोग होतो. मात्र अर्धवट पुलामुळे व रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पावसाळ्यात स्मशानभूमीत जाऊन दफनविधी करण्यास अडचण येत आहे. प्रशासनाने या ठिकाणी केवळ ५० मीटरचाच रस्ता कसा काय मंजूर केला, असा प्रश्न या भागातील नागरिकांपुढे निर्माण झाला आहे. नाल्याच्या पलीकडे हजारो एकर शेती असून पुलाअभावी शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्याऐवजी उलअ वाढला आहे. (वार्ताहर)दोन पुलाचे काम प्रलंबितचतळोधी (मो.) गावाकडून दागोबा देवस्थानाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. तसेच वन विभागाच्या नाक्याजवळून वैनगंगा नदीघाटाकडे जाणाऱ्या मार्गावर एक नाला आहे. या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम करणे आवश्यक आहे. तशी नागरिकांकडून मागणीही सातत्याने होत आहे. मात्र प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाचे बांधकाम मंजूर केले नाही. त्यामुळे या मार्गावरील रहदारी प्रभावीत होत आहे. पावसाळ्यात या भागातील शेतकरी जीव धोक्यात घालून पाण्यातून प्रवास करतात. प्रशासनाने या दोन्ही नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.