शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी

By admin | Updated: July 14, 2015 02:05 IST

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या सत्रापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

गडचिरोली : राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने यंदा २०१५-१६ या सत्रापासून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या सर्व वसतिगृहांकरिता विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेचा निर्णय घेतला. त्यानुसार गडचिरोली प्रकल्पातील मुला-मुलींचे मिळून एकूण २१ वसतिगृहांसाठी इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालानंतर जून महिन्यापासून आॅनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र बहुतांश विद्यार्थ्यांची वैयक्तिक व शैक्षणिक माहितीचा डाटा आदिवासी विकास विभागाच्या ई-ट्रायबल या वेबसाईडवर अपलोड होत नसल्याने या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रचंड अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत आदिवासी मुलींचे आठ व मुलांचे १३ असे एकूण २१ शासकीय वसतिृह आहेत. यामध्ये गडचिरोलीत मुलांचे दोन, मुलींचा एक तसेच चामोर्शी, कुरखेडा, देसाईगंज, धानोरा, आरमोरी, घोट, मोहली, कोरची, आष्टी, मालेवाडा, चातगाव आदी ठिकाणी मुलांचे वसतिगृह आहेत. तर चामोर्शी, कुरखेडा, धानोरा, आरमोरी, देसाईगंज, आष्टी व कोरची या ठिकाणी मुलींचे वसतिगृह आहेत. या २१ शासकीय वसतिगृहाची मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता एकूण २ हजार १८५ आहे. मात्र काही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत असल्याने यात कमी विद्यार्थ्यांच्या निवासाची सुविधा करण्यात येते. त्यामुळे २१ वसतिगृहाची विद्यार्थी प्रवेश क्षमता एकूण २ हजार १५५ आहे. या सर्व वसतिगृहांमध्ये दोन लाख रूपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या अनुसूचित जमाती प्रवर्गातील इयत्ता आठवी ते पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या मुला-मुलींना प्रवेश दिल्या जातो. यंदा २०१५-१६ सत्रापासून वसतिगृहात प्रवेश मिळविण्यासाठी नवे विद्यार्थी तालुकाच्या ठिकाणी इंटरनेटची सुविधा असलेल्या कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन आॅनलाईन अर्ज भरत आहेत. याशिवाय शहरातील वसतिगृहांमध्ये एक कम्प्युटर इंटरनेट सुविधेसह ठेवण्यात आले आहे. आॅनलाईन प्रवेश अर्जात संबंधित विद्यार्थ्यांचा आधारकार्ड क्रमांक, विद्यार्थ्यांची संपूर्ण शैक्षणिक माहिती, आर्थिक उत्पन्न तसेच भारत सरकार अथवा सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजनेच्या लाभाबाबतचे पासवर्ड व आयडी नोंदविणे आवश्यक आहे. मात्र इयत्ता अकरावी व इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीबाबतची माहिती ईट्रायबल वेबसाईडवर अपलोड होत नसल्याने या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत.आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी आॅनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०१५ पर्यंत ठेवण्यात आली आहे. मात्र आॅनलाईन प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यामुळे आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली जाणार असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांकडून मिळाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)वसतिगृहनिहाय गुणवत्ता यादीनुसार प्रवेशआदिवासी विकास विभागाने यंदाच्या सत्रापासून सर्व शासकीय वसतिगृहासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहे. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहासाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.वसतिगृहनिहाय गुणवत्ता यादीनुसार प्रवेशआदिवासी विकास विभागाने यंदाच्या सत्रापासून सर्व शासकीय वसतिगृहासाठी आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. विद्यार्थ्यांकडून आॅनलाईन प्रवेश अर्ज स्वीकारले जात आहे. गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत ज्या विद्यार्थ्यांनी ज्या वसतिगृहासाठी आॅनलाईन अर्ज दाखल केले आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहस्तरावर गुणवत्ता यादी तयार करून प्रकल्प अधिकारी कार्यालयाच्या मंजुरीनंतर संबंधित वसतिगृहांच्या अधीक्षकांकडून संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. इयत्ता आठवी ते दहावीच्या ४२१ विद्यार्थ्यांचे आॅफलाईन प्रवेशएकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोलीअंतर्गत आदिवासी मुला-मुलींच्या २१ शासकीय वसतिगृहात इयत्ता आठवी ते दहावीतील प्रवेश घेणाऱ्या इच्छुक विद्यार्थ्यांना आॅनलाईन प्रवेशप्रक्रियेपासून सूट देण्यात आली आहे. इयत्ता आठवी ते दहावीतील एकूण ४२१ विद्यार्थ्यांचे वसतिगृहात आॅफलाईन प्रवेश झाले आहे. यामध्ये जवळपास ५० विद्यार्थी मागील वर्षीचे प्रवेशीत विद्यार्थी आहेत.