शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलच्या तुटवड्याने सारेच त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 22:46 IST

गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावांमध्ये पेट्रोल व डिझेलपंप आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच पंपावर डिझेलचा तुटवडा रविवारी सायंकाळपासून निर्माण झाला आहे. पंपावर येऊनही डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर व चारचाकी वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.

ठळक मुद्देवाहनधारकांसह लग्न वऱ्हाड्यांना फटका : ट्रॅक्टरद्वारे नांगरणी व पेरणी खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली शहरासह तालुक्याच्या ठिकाणी तसेच मोठ्या गावांमध्ये पेट्रोल व डिझेलपंप आहे. मात्र जिल्ह्यातील सर्वच पंपावर डिझेलचा तुटवडा रविवारी सायंकाळपासून निर्माण झाला आहे. पंपावर येऊनही डिझेल मिळत नसल्याने ट्रॅक्टर व चारचाकी वाहनधारक प्रचंड त्रस्त झाले आहेत.सध्या खरीप हंगामाच्या पेरणीचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी लवकर पेरणीचे काम आटोपण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर करीत आहेत. मात्र हे ट्रॅक्टर चालविण्यासाठी डिझेल मिळत नसल्याने सोमवारी अनेकांच्या पेरण्या खोळंबल्या. गडचिरोली, आरमोरी तालुक्यासह अनेक ठिकाणच्या ट्रॅक्टर डिझेलअभावी उभ्या होत्या. सोमवारी गडचिरोली शहरासह अनेक ठिकाणी लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र डिझेल न मिळाल्याने नवरदेवाकडील वºहाडी मंडळी दोन ते तीन तास विलंबाने लग्नस्थळी पोहोचले. परिणामी वºहाड्यांना त्रास सहन करावा लागला.डिझेलवर चालणाऱ्या ट्रक, ट्रॅक्टर व इतर चारचाकी वाहनांचे वाहतूक काही प्रमाणात मंदावली होती. पेट्रोल महाग झाल्याने अनेक शासकीय व निमशासकीय नोकरदारांनी डिझेलवर चालणाºया कार खरेदी केल्या आहेत. रविवारी सुट्टीच्या दिवशी अनेक नोकरदारांना बाहेरगावी जायचे होते. मात्र कित्येकजणांना कारमध्ये टाकण्यासाठी डिझेल न मिळाल्याने त्यांना आपला दौरा रद्द करावा लागला. डिझेल तुटवड्यासंदर्भात गडचिरोली येथील एका पेट्रोलपंपावर चौकशी केली असता, कंपन्यांमध्ये डिझेलचा तुटवडा आहे. वरिष्ठपातळीवरूनच गडचिरोली जिल्ह्यात डिझेलचा पुरवठा झाला नाही. सोमवारी रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत डिझेलचा टँकर गडचिरोलीत पोहोचणार असल्याची माहिती मिळाली असल्याचे सांगण्यात आले.तुटवड्याची चौकशी करा- भडांगेरविवारी सायंकाळपासून गडचिरोली जिल्ह्याच्या एकाही पंपावर वाहनधारकांना डिझेल मिळाले नाही. ट्रॅक्टरच्या सहाय्याने होणारे शेतातील नांगरणी व पेरणीचे काम थांबले आहे. डिझेलचा तुटवडा कसा निर्माण झाला, याबाबत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे पदाधिकारी तथा ग्राहक कल्याण परिषेदचे विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर भडांगे यांनी केली आहे.