शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

तुमच्या पिंडाला कावळा शिवला का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2022 05:00 IST

कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. 

गोपाल लाजूरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ‘चिमणी चिव नाही अन् कावळा काव नाही, अशा भव्य अरण्यात’ अशी विशेषणे असलेल्या कथा व गोष्टी बालपणी ऐकत असताना पटकन लक्षात यायचे की, ‘हे’ पक्षी गावालगतच असतात. जंगलात राहत नाहीत. ८ ते १० वर्षांपूर्वी हे जाणवायचेसुद्धा; परंतु आता ही स्थिती बदलली. गावोगावी, घरे व झाडांवर दिसणारे कावळे आता कुठे अदृश्य झाले? खरंच कावळे कुठे गडप झाले, हे मात्र कुणालाच कळेना झाले आहे. जागतिक कावळा दिनानिमित्त याकडे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे.

कावळा म्हटले की, कर्कश आवाज, कपटी, चतुर, स्वार्थी, असे विविध गुण- अवगुण व कौशल्य असलेला पक्षी लक्षात येतो; परंतु पर्यावरणात कावळा तितकाच महत्त्वाचा. मेलेल्या लहान प्राण्यांचे मांस खाणे, शेतातील कीटक खाणे, ही त्याची कामे; परंतु तो पितृमोक्ष अमावास्येलाच का आठवतो? पूर्वजांच्या पिंडाला शिवण्या(स्पर्श)साठी, नाहीतर घरावर ओरडत असला तर कुणीतरी पाहुणे येणार, हे सांगण्यासाठी. विशेष म्हणजे, त्याच्या ओरडण्याचा व पाहुणे घरी येण्याचा काही एक संबंध नाही; पण त्यानिमित्ताने कावळा आठवत होता, घरावर दिसत होता. मात्र, आता तो दिसेनासा झाला आहे. पिंडाला शिवण्यासाठीही कावळ्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे. गेल्या पाच वर्षांत कावळ्यांची संख्या झपाट्याने घटली, जैवविविधतेच्या ऱ्हासाची ही नांदीच नाही काय? असा सवाल पक्षीप्रेमींकडून केला जात आहे. 

कावळे काय खातात? 

कावळ्याला सर्वभक्ष्यी पक्षी म्हटले जाते. त्याचे सरासरी आयुष्य १२ ते १५ वर्षे असते. त्याचे मुख्य अन्न हे शिजलेले अन्न, धान्य, अंडी, फळे, बिया, शिळे अन्न हे आहे. प्रसंगी उंदीर, चुचुंद्री, बेडूक आदींची शिकारही ते करतात. याशिवाय शेतातील किडे, अळ्या, जनावरांच्या अंगावरील गोचीड, जखमेतील किडेसुद्धा कावळे खातात.

मानवी वस्तीने संपविला कावळ्यांचा अधिवाससिमेंटच्या वाढत्या जंगलांमुळे झाडांचे प्रमाण कमी झाले. गावालगतची अन् वस्तीतली झाडे नष्ट झाली. कावळे हे वस्तीलगत वास्तव्य करीत असल्याने त्यांच्या अधिवासाचा प्रश्न निर्माण झाला. आपोआपच कावळ्यांनी गाव सोडले, काही नष्ट झाले. -    महाराष्ट्रात मे ते जुलैदरम्यान त्यांचा विणीचा हंगाम असतो. कावळे ४-५ अंडी घालतात, असे पक्षीप्रेमी अजय कुकडकर यांनी सांगितले; पण आता तसे अधिवासाचे वातावरण त्यांना मिळेनासे झाले आहे.

 

टॅग्स :Natureनिसर्ग