मोफत सेवा : जिल्ह्यात आठ रूग्णवाहिका कार्यरतदिगांबर जवादे गडचिरोली१०८ क्रमांकाच्या रूग्नवाहिकेने घटनास्थळी तत्काळ पोहोचून वर्षभरात सुमारे २ हजार ८१५ रूग्णांना रूग्णालयात पोहोचवून त्यांचे प्राण वाचविले आहे. देशाची ५० टक्के पेक्षा अधिक लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. या भागात एखादी दुर्घटना किंवा आपातकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास वेळेवर रूग्णांना किंवा जखमी नागरिकाला तत्काळ रूग्णालयात दाखल करता यावे, यासाठी राज्य शासनाने मोफत रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. मोबाईल किंवा लँडलाईनवरून १०८ क्रमांक डायल केल्यानंतर या सेवेचा लाभ घेता येत असल्याने या रूग्णवाहिकेला १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका असे संबोधले जाते. गडचिरोली जिल्ह्यात या सेवेचा शुभारंभ ६ मे २०१४ रोजी झाला. सद्य:स्थितीत गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, अहेरी उपजिल्हा रूग्णालय, सिरोंचा, कोरची, भामरागड, एटापल्ली, मुलचेरा ग्रामीण रूग्णालय व गडचिरोली जिल्हा रूग्णालय अशा आठ ठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध आहेत. वर्षभराच्या कालावधीत सुमारे २ हजार ८१५ रूग्णांना जवळपासच्या रूग्णालयात वेळीच दाखल करून त्यांचे प्राण वाचविले आहे. गरीब रूग्णांकडे वेळेवर पैसेही राहत नाही. अशा परिस्थितीत वाहनाचे भाडे देण्याचा प्रश्न निर्माण होत होता. मात्र १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका अगदी मोफत व घरापासून सुविधा उपलब्ध करून देत असल्याने जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष सोयीचे झाले आहे. अशी चालते रूग्णवाहिकेची यंत्रणा१०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेत अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकेसाठी स्वतंत्र डॉक्टर नेमण्यात आला आहे. रूग्णवाहिकेचा लाभ घेण्यासाठी मोबाईल किंवा दूरध्वनीवरून १०८ क्रमांक डायल केल्यानंतर सदर फोन या रूग्णवाहिका सेवेचे मुख्य केंद्र असलेल्या पुणे येथे लागतो. या कार्यालयाच्या मार्फतीने रूग्णाचा पत्ता विचारल्यानंतर जवळपासची रूग्णवाहिका तत्काळ त्या ठिकाणी पाठविण्यात येते. विशेष म्हणजे, ही संपूर्ण सेवा मोफत आहे. १०० महिलांची रूग्णवाहिकेतच प्रसूतीया रूग्णवाहिकेचा लाभ गरोदर मातानाही दिला जातो. वर्षभराच्या कालावधीत जवळपास १०० महिलांची रूग्णवाहिकेतच प्रसूती झाली असल्याची माहिती रूग्णवाहिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या रूग्णवाहिकेत प्रशिक्षित डॉक्टर राहत असल्याने माता व नवजात बालकांचे प्राण वाचले आहे. यासाठी दिला जातो लाभरस्त्यावरील अपघात, सर्पदंश, हृदय विकाराचा झटका, प्रसूतीची गुंतागुंत, भूकंप, जीर्ण आजार, मलेरिया, साथीचे रोग व डोक्याला मार लागणे यासाठी सदर रूग्णवाहिका उपलब्ध करून दिली जाते.
डायल १०८ ने २ हजार ८०० रूग्णांना नवसंजीवनी
By admin | Updated: July 7, 2015 01:16 IST