शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धर्मा रॉयचे अतिक्रमण पाडले

By admin | Updated: February 18, 2017 01:57 IST

आष्टी रोडजवळील मोठ्या नहराला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४१/१ आराजीमधील ८.२८ हेक्टरपैकी

महसूल प्रशासनाची कारवाई : घरातील साहित्य जप्त गडचिरोली : आष्टी रोडजवळील मोठ्या नहराला लागून असलेल्या भूमापन क्रमांक १४४१/१ आराजीमधील ८.२८ हेक्टरपैकी १.६० हेक्टर आर या शासकीय जागेवर धर्मा निमाई रॉय यांनी अनधिकृत अतिक्रमण केले होते. परंतु महसूल प्रशासनाने अतिक्रमण केलेल्या जागेवर शुक्रवारी पक्के अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्याने पाडले आहे. या अतिक्रमणामध्ये सभामंडप, मंदिर यांचाही समावेश आहे. याच परिसरात अनधिकृत अतिक्रमण केलेल्या इतर अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील इतर अनधिकृत अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले आहे. ही अतिक्रमण काढण्याची कारवाई उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, तहसीलदार अरूण येरचे, मुख्याधिकारी अर्शीया जुही, पोलीस निरिक्षक किरण अवचार, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, एन. पी. मंथनवार, एस. के. बावणे, मंडळ अधिकारी पी. एम. बोदलकर, तलाठी शेडमाके, तहसील व नगर पंचायतीचे कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या उपस्थित करण्यात आली. तसेच अतिक्रमणधारक सेपाली बलराम मंडल हिने केलेले ०.२० हेक्टर आर वरील यांचे शेती, मंदिराचे अतिक्रमण काढण्यात आले. तर अतिक्रमण हटविण्यासाठी तहसीलदार यांनी १४ आॅक्टोबर २०१६ व १५ डिसेंबर २०१६ रोजी नोटीस बजाविले होते. मात्र सदर अतिक्रमण राजकीय दबावापोटी न काढता वारंवार पळवाटा शोधण्यात येत होत्या. धर्मा रॉय याच्या अतिक्रमणासंदर्भात अनेक तक्रारी शहरातील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते माणिकराव तुरे यांनीही अधिकाऱ्यांकडे केल्या होत्या. धर्मा रॉय याच्या घरातील साहित्य काढून त्याचा पंचनामा करून ते साहित्य जप्त करण्यात आले आहे.(जिल्हा प्रतिनिधी)