शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

धानपिकांना संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:18 IST

कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे.

ठळक मुद्दे३६६ एकर जागेला सिंचन : आरमोरी तालुक्यात ८७ शेततळे तयार

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कमी पावसामुळे दुष्काळसदृश स्थिती निर्माण झालेली असताना धानपिकाला शेततळ्यांचे पाणी देऊन वाचविले जात आहे. आरमोरी तालुक्यातील ८७ शेतकºयांकडे शेततळे असून यामुळे जवळपास ३६६ एकराला सिंचन सुविधा उपलब्ध झाली आहे.मोठे जलसिंचन प्रकल्प निर्माण करणे अशक्य असल्याने शासन वैयक्तिक जलसिंचनावर विशेष भर देत आहे. याअंतर्गतच शेतकºयांना १०० टक्के अनुदानावर विहीर, शेततळे खोदून दिले जात आहे. धानपिकाला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सिंचनाची गरज भासते. त्यामुळे संबंधित शेतकºयाकडे संरक्षित जलसाठा असणे अत्यंत आवश्यक आहे. आरमोरी तालुक्यातील शेतकºयांनी विविध योजनेअंतर्गत शेततळे बांधले आहेत. सुमारे ८७ शेतकºयांनी शेततळ्यांचा लाभ घेतला आहे. यावर शासनाने ६१ लाख रूपयांचे अनुदान दिले आहे. शेततळ्यांमुळे जवळपास ३६६ एकराला जलसिंचन होणार आहे. आठ दिवसांच्या पूर्वी पावसाने उसंत घेतली होती. दिवसा कडक ऊन पडत असल्याने धानपीक करपायला लागले होते. अशा कालावधीत शेतकºयांनी शेततळ्यातील पाण्याचा वापर करून धानपीक जगविले आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने आणखी १५ दिवस धानाला सिंचनाची गरज आहे. तोपर्यंत शेततळ्यातील साठा संरक्षित ठेवला जाणार आहे. आकस्मिक स्थितीत या पाण्याचा वापर केला जात आहे.काही शेतकºयांच्या शेततळ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आहे. शेततळ्यांचे पाणी फेब्रुवारी, मार्च महिन्यापर्यंत राहते. त्यामुळे सदर शेतकरी भाजीपाल्याचेही उत्पादन घेतात. शेततळ्यांच्या माध्यमातून शेतकºयांना दुहेरी उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे.अडचणींच्या वेळी शेततळ्याचे पाणी धानपिकासाठी अत्यंत उपयुक्त ठरले आहे. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग संरक्षित जलसाठा म्हणून केला जातो. त्यामुळे या पाण्याचा उपयोग करताना बांधिमध्ये पाणी साचेपर्यंत पाणी देऊ नये. पाण्याचा सुयोग्य वापर करावा.- एस.पी. ढोणे,तालुका कृषी अधिकारी, आरमोरी