पत्रकार परिषद : पोलीस अधीक्षकांची माहितीगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या भसमनटोला येथील रैनू सैनू हिचामी याने पत्रकार परिषद घेऊन देवराम कटिया हिचामी हा नक्षलवादी नसल्याचा दावा केला होता. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी देवराम हिचामी हा नक्षलवादीच आहे, ही बाब गुरूवारी पोलीस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट केली.तीन महिन्यांपूर्वी चिचोडा जंगल परिसरात पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली होती. या चकमकीत देवराम हिचामी हा सहभागी होता. चकमकीनंतर पोलिसांनी जप्त केलेल्या नक्षल साहित्यात देवरामचा फोटो पोलिसांना मिळून आला. यामध्ये तो रायफल व बॅनरसह दिसत असल्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी यावेळी सांगितले.मागील महिन्यात नक्षल जोडप्याने आत्मसमर्पण केले होते. हे आत्मसमर्पीत जोडपे चांगले जीवन जगत असल्याची माहिती दीपक ओक्शा व त्याची पत्नी मनिषा मडावी हिला मिळाली. त्यानंतर याही दाम्पत्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याचा विचार व्यक्त केला. आजपर्यंत सुमारे सात जोडप्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यांनाही शासनाच्या धोरणानुसार आर्थिक लाभ दिला जाणार असल्याची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (नगर प्रतिनिधी)
देवराम हिचामी नक्षलवादीच !
By admin | Updated: December 11, 2015 01:56 IST