शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी अतिवृष्टीमुळे अंदाजे ६० लाख हेक्टर नुकसान, पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
4
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
5
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
6
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
7
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
8
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
9
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
10
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
11
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
12
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
13
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
14
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
15
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
16
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
17
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
18
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
19
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
20
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

आरमोरीतील देवकुले परिवार चार पिढ्यांपासून गाठींच्या व्यवसायात

By admin | Updated: March 11, 2017 01:32 IST

शहरातील कुंभार मोहल्ल्यातील विमल वसंतराव देवकुले यांचा परिवार मागील चार पिढ्यांपासून साखरगाठी व्यवसाय करीत आहे.

होळीनिमित्त मागणी वाढली : महाशिवरात्रीपासून गाठी बनविण्याला होते सुरूवात आरमोरी : शहरातील कुंभार मोहल्ल्यातील विमल वसंतराव देवकुले यांचा परिवार मागील चार पिढ्यांपासून साखरगाठी व्यवसाय करीत आहे. कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर गाठी बनविताना केला जात नसल्याने देवकुले परिवाराच्या गाठीला आरमोरी तालुक्यात विशेष पसंती मिळत आहे. होळीला साखरगाठी देण्याची परंपरा हिंदू धर्मामध्ये आहे. त्यामुळे होळी सणाच्या आठ दिवसांपूर्वीच आठवडी बाजार, शहर व ग्रामीण भागातील दुकाने गाठ्यांनी सजण्यास सुरूवात होतात.प्रत्यक्षात गाठी बनविण्यास महाशिवरात्रीपासूनच सुरूवात होते, अशी माहिती विमल वसंतराव देवकुले यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे. दरवर्षी जवळपास १० पोते साखरीच्या गाठी बनविल्या जातात. या गाठींची विक्री आरमोरी, वैरागड आठवडी बाजार तसेच आरमोरी तालुक्यातील लहान-मोठ्या गावातील आठवडी बाजारांमध्ये केली जाते. ५० ते ६० हजार रूपयांच्या गाठींची दरवर्षी विक्री होते. विमल देवकुले, त्यांचा मुलगा अनुप व इतर चार मजुरांच्या मदतीने गाठ्या बनविल्या जातात. (वार्ताहर) हाताने बनविलेल्या गाठीस आरमोरी तालुकावासीयांची पसंती गडचिरोली तसेच मोठमोठ्या शहरांमधील दुकानांमध्ये दिसणाऱ्या साखरगाठ्या यंत्राच्या सहाय्याने बनविल्या जातात. गाठी पोकळ व्हावी, त्याचबरोबर दिसण्यासाठी ती आकर्षक असावी, यासाठी गाठीमध्ये रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो. मात्र देवकुले परिवार मागील चार पिढ्यांपासून अजूनही पारंपरिक रीतीनेच गाठी बनवित आहे. या गाठीमध्ये रासायनिक पदार्थ टाकले जात नाही. त्यामुळे देवकुले यांच्या गाठीची चव नागपूरच्या गाठीच्या तुलनेत अतिशय चांगली आहे. याचा अनुभव आरमोरी तालुक्यातील नागरिकांना मागील ४० वर्षांपासून आहे. त्यामुळे देवकुले परिवाराचा दुकान आठवडी बाजारामध्ये लागताच ग्रामीण भागातील नागरिकांची गाठी घेण्यासाठी गर्दी होते. त्यामुळे चिल्लर विक्री करूनही या व्यवसायातून ५० ते ६० हजार रूपयांची वार्षिक उलाढाल केली जात आहे.