शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

विकासाभिमुख संशोधन व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 21:28 IST

२१ व्या शतकात विविध क्षेत्रात संशोधन होत असले तरी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी संशोधन झाले पाहिजे, कोणतेही संशोधन हे विकासाभिमुख असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.

ठळक मुद्देकुलगुरूंचे प्रतिपादन : गोंडवाना विद्यापीठात संशोधन उत्सव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २१ व्या शतकात विविध क्षेत्रात संशोधन होत असले तरी मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी संशोधन झाले पाहिजे, कोणतेही संशोधन हे विकासाभिमुख असावे, असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर यांनी केले.गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर शैक्षणिक विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठात ‘अविष्कार-२०१७’ या विद्यापीठस्तरीय दोन दिवसीय संशोधन उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.या उत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बुधवारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी प्रमुख अतिथ म्हणून प्र-कुलगुरू डॉ. सी.व्ही.भुसारी नियंत्रक डॉ. जे.व्ही.दडवे, लेखा व वित्त अधिकारी डॉ.मोहुर्ले, विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया गेडाम आदी उपस्थित होते. कुलगुरू डॉ. कल्याणकर यांनी ‘अविष्कार-२०१७’ चे उद्घाटन केले.यावेळी मान्यवरांनाही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन करिष्मा राखुंडे, प्रास्ताविक विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका डॉ. प्रिया गेडाम तर आभार डॉ. नरेश मडावी यांनी मानले. यावेळी विद्यार्थी उपस्थित होते.१४० प्रतिकृती सादरमहात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे १५ ते १७ जानेवारी २०१८ दरम्यान होणाऱ्या आविष्कार २०१८ च्या धर्तीवर गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या वतीने ‘आविष्कार २०१७’ चे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे मिळून एकूण १४० प्रतिकृती सादर करण्यात आले. यामध्ये पदवीस्तर, पदव्युत्तरस्तर तसेच शिक्षक स्तर आदी श्रेणीतील प्रतिकृतींचा समावेश होता. प्रदर्शनीत कृषी, औषधी, मानव विद्या शाखा, वाणिज्य व इतर शाखांमधील प्रतिकृती होत्या.

टॅग्स :universityविद्यापीठ