शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
3
महागड्या गाड्यांचं कलेक्शन, कमाईतही एक नंबर; पाहा किती श्रीमंत आहे शुबमन गिल
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
6
Bobby Darling : "माझ्या आईच्या मृत्यूला मी जबाबदार, मला माफ कर...", ढसाढसा रडली बॉबी डार्लिंग
7
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
8
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
9
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
10
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
11
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
12
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
13
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
14
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
15
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
16
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
17
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
18
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
20
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार

नियोजनाअभावी खुंटला सिरोंचा शहराचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 00:37 IST

सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतरण होऊन आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे सिरोंचा शहराचा विकास पूर्णत: खुंटला आहे. शहराच्या अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या आहेत.

ठळक मुद्देअनेक वॉर्डात विविध समस्या ऐरणीवर : नगर पंचायतीच्या दुर्लक्षितपणामुळे सिरोंचावासीयांची होतेय ससेहोलपट

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतरण होऊन आता तीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र नगर पंचायत प्रशासनाच्या नियोजनशून्यतेमुळे सिरोंचा शहराचा विकास पूर्णत: खुंटला आहे. शहराच्या अनेक वॉर्डात नाली, रस्ते, शौचालय व इतर मूलभूत समस्या ऐरणीवर आल्या आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत येथील सत्ताधाऱ्यांना शासनाकडून अपेक्षित निधी खेचून आणता न आल्याने सिरोंचा शहराची सध्या वाट लागली आहे.सन २०१५ मध्ये सिरोंचा ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीत रूपांतर झाले. सिरोंचा व सिरोंचा माल अशा दोन ग्रामपंचायती मिळून नगर पंचायत अस्तित्वात आली. १७ सदस्यीय नगर पंचायतीची निवडणूक होऊन नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदावर विराजमान झाले. अनेकांना नगरसेवक पदही मिळाले. ग्रामपंचायतीचे नगर पंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर शहराचा कायापालट होणार, अशी अपेक्षा शहरवासीयांना होती. मात्र नियोजन शून्यतेमुळे व उदासीनतेमुळे शहराची विकासाकडे वाटचाल होऊ शकली नाही. नगर पंचायतीच्या स्थापनेनंतर प्रथमच प्रशासक म्हणून येथील तत्काली तहसीलदार कुमरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर मुख्याधिकाºयांची नियुक्ती येथे झाली. मात्र ज्या गतीने शहराचा विकास व्हायला पाहिजे होता, तशी विकासात गती आली नाही.विकास कामांसाठी शासनाकडून निधी खेचून आणणारा तडपदार व कर्तव्यदक्ष पदाधिकारी व नगरसेवकांची गरज असते. मात्र गेल्या तीन वर्षात अशा प्रकारचा निधी खेचून विकास कामांना गती देणारा एकही पदाधिकारी नागरिकांना येथे पाहायला मिळाला नाही.तत्कालीन ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अब्दुल रहीम होते, त्यावेळी कब्रस्थानपर्यंत गिट्टी व मुरूमाच्या सहाय्याने पक्का रस्ता तयार केला होता. त्यानंतर आजपर्यंत विद्यमान कोणत्याही पदाधिकारी व नगरसेवकांनी सदर रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले नाही. आता कब्रस्थानाच्या मार्गावर झुडपी जंगलाचे साम्राज्य पसरले आहे. नगर पंचायतीने या प्रश्नाकडे लक्ष देऊन येथे स्वच्छता करावी, तसेच रस्त्याची दुरूस्ती करावी तसेच नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, सभापती व नगरसेवकांनी विकासाचा ध्यास घ्यावा, अशी मागणी केली आहे.कब्रस्तानाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था, नाली व पक्क्या रस्त्यांचाही अभावशहरातील मुस्लीम कब्रस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. सदर मार्गावर स्ट्रिट लाईटची सुविधा नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी एखाद्या मृत इसमाला दफनविधीसाठी नेताना लोकांना खूप त्रास होतो. मासेमारी करणारे लोक रात्रीच्या वेळेस याच मार्गाने आवागमन करतात. धर्मशाळेच्या मागील बाजूला झुडूपी जंगल मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून नागरिकांना धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या गंभीर समस्येकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. मन्नेवार वॉर्ड ते सय्यद कॉलनी, प्रभाग क्र.३ मध्ये नाल्यांची सफाई करण्यात आली नाही. तसेच काही ठिकाणी नव्या नाल्यांची गरज असताना सुद्धा नवीन नाली बांधकाम करण्यात आले नाही. प्रभाग क्र.१२, १३, १४ व १७ मध्ये नवीन नाल्यांची निर्मिती करण्यात आली नाही. त्यामुळे अस्वच्छतेचे साम्राज्य निर्माण झाले आहे.