शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

किन्हाळाचा विकास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:42 IST

गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले.

ठळक मुद्देपुनर्वसित गाव : काही कुटुंब स्थलांतरित झालीच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गाढवी नदीच्या काठावर वसलेल्या किन्हाळा व अरततोंडी या दोन्ही गावांना पुराचा फटका बसत होता. या गावाचे १९९४ रोजी पुनर्वसन करण्यात आले. ही दोन्ही गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.किन्हाळा व अरततोंडी ही गावे गाढवी नदीच्या जवळ सखल भागात वसली होती. या गावांमध्ये गाढवी नदीच्या पुराचे पाणी शिरत होते. परिणामी दरवर्षी येथील नागरिकांना दुसºया ठिकाणी विस्थापीत व्हावे लागत होते. पुराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने आर्थिक हानी होत होती. १९९४ मध्ये ही दोन्ही गावे पुराच्या तडाख्यात सापडली होती. त्यावर्षी या दोन्ही गावांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्यानंतर या दोन्ही गावांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. या गावांचे पाच किमी अंतरावरील मोहटोला व चिखली रिठ या आबादी जागेत पुनर्वसन करण्यात आले. ज्या वेळेवर नागरिकांचे पुनर्वसन झाले. त्या वेळेवर शासनाने रस्ते, नाल्या आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु निकृष्ठ दर्जाचे काम झाल्याने या सुविधा अल्पावधीतच नेस्तनाभूत झाल्या. आजच्या स्थितीत या दोन्ही गावांमध्ये रस्ते, नाल्या, पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. किन्हाळा गावच्या नाल्या पूर्णपणे खचल्या आहेत. सांडपाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे चित्र दिसून येते. पावसाळ्यात ही समस्या गंभीर होते. पुनर्वसीत गावांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे गरजेचे असताना या दोन्ही गावांना वंचित ठेवले जात आहे. किन्हाळा या गावाप्रमाणेच अरततोंडी गावाचे चिखली रिठ येथील आबादी जागेत पुनर्वसन झाले. परंतु जुन्या अरततोंडी गावातील अर्धे अधिक नागरिक आजतागायत नवीन पुनर्वसीत ठिकाणी आलेले नाहीत. फक्त मिळालेल्या नवीन जागेवर त्यांनी कब्जा करून ठेवला आहे. रेशनपासून तर शाळेपर्यंतच्या सुविधांबाबत हे गाव द्विधा स्थितीत आहे. नागरिक दोन ठिकाणी राहत असल्याने सोयीसुविधा पुरविताना अडचण जात आहे. सोयी सुविधांचा अभाव असल्याने या दोन्ही गावातील नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.