शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विज्ञानाच्या सदुपयोगातून सर्वसामान्यांचा विकास व्हावा

By admin | Updated: November 29, 2015 02:13 IST

गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कुटुंब अद्यापही दारिद्र्यात आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा,...

देवेंद्र भांडेकर यांचे प्रतिपादन : तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीला प्रारंभगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील हजारो कुटुंब अद्यापही दारिद्र्यात आहे. सर्वसामान्य गरीब नागरिकांच्या विकासासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाचा सदुपयोग व्हावा, असे प्रतिपादन गडचिरोली पंचायत समितीचे सभापती देवेंद्र भांडेकर यांनी केले.तालुक्यातील आंबेशिवणी येथील विद्याभारती हायस्कूलमध्ये शनिवारी तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी उद्घाटक म्हणून जि.प. सदस्य प्रशांत वाघरे तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. उपसभापती किशोर गद्देवार, दंडकारण्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, पं.स.सदस्य संध्या झंजाळ, गट शिक्षणाधिकारी उद्धव डांगे, आंबेशिवणीचे सरपंच माणिक झंजाळ, उपसरपंच प्रतीज्ञा राऊत, पोलीस पाटील देवेंद्र भैसारे, ग्रा.पं. सदस्य पौर्णिमा पाल, देविदास आत्राम, दादा चुधरी, प्राचार्य मुकूंद म्हशाखेत्री, प्राचार्य सागर म्हशाखेत्री आदी उपस्थित होते. केवळ औपचारिकता म्हणून विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करू नये. संशोधनाची सांगड मानवता व विकासाशी जोडल्या गेली पाहिजे. प्रत्येकाने वैज्ञानिक दृष्टीकोण बाळगूण विज्ञानाचा उपयोग सर्वांगिण विकासासाठी करावा, असे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी यावेळी सांगितले. यावेळी पं.स. उपसभापती किशोर गद्देवार यांनी क्रीडा संमेलन व विज्ञान प्रदर्शनातील जिल्हा परिषदेने निधी वाढवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी जि.प. सदस्य प्रशांत वाघरे, पं.स. सदस्य संध्या झंजाळ यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मनोज हुलके तर आभार प्राचार्य सागर म्हशाखेत्री यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)