शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
3
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
4
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
5
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
6
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
7
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
8
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
9
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
10
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
11
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
12
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
13
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
14
होणाऱ्या सुनेसोबत पळून गेलेला सासरा ८ दिवसांनी परतला; कहाणीत आला नवा ट्विस्ट
15
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
16
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
17
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
18
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
19
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
20
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...

चार कोटींच्या निधीतून होणार शहराचा विकास

By admin | Updated: April 8, 2016 01:20 IST

गडचिरोली नगर पालिकेतील अनेक विकास कामे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंडबस्त्यात होती.

निविदा निघाली : न. प. बांधकाम सभापतींचा पुढाकारगडचिरोली : गडचिरोली नगर पालिकेतील अनेक विकास कामे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे थंडबस्त्यात होती. त्यामुळे शहरातील विकास कामांसाठी निधीही उपलब्ध होत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर नगर परिषदेच्या बांधकाम सभापती पदाची सूत्रे स्वीकारलेल्या प्रा. राजेश कात्रटवार यांनी शासन दरबारी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे गडचिरोली शहराच्या विकासासाठी चार कोटी रूपयांच्या निधीच्या विकास कामांची निविदा निघाली आहे. त्यामुळे शहरातील विकास कामे होण्यास मदत होणार आहे. नगर पालिका प्रशासनातील मुख्याधिकारी शहराच्या विकास कामांकडे विशेष लक्ष देत नव्हते. त्यामुळे शहरातील अनेक विकास कामे थंडबस्त्यात होती. परंतु न. प. बांधकाम सभापती पदाची सूत्रे घेतल्यानंतर प्रा. राजेश कात्रटवार यांनी शहर विकासासाठी शासन दरबारी केलेल्या वारंवारच्या पाठपुराव्यामुळे शहराच्या विकासासाठी चार कोटींच्या विकासकामांसाठी निविदा निघाली आहे. नगर पालिकेला दलितवस्ती सुधार व नगर उद्यान योजनेचा कोट्यवधी रूपयांचा निधी आला होता. मात्र मागील वर्षी एकाही विकास कामाची ई- निविदा निघाली नाही. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने गडचिरोली शहर माघारले होते. प्रा. राजेश कात्रटवार यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार, आमदार यांच्याकडे निवेदन सादर करून शहरातील विकासासाठी निधी उपलब्ध करून ई- निविदा काढण्याची मागणी केली. त्यामुळे आता पालिकेने चार कोटी रूपयांची विकास कामांची ई- निविदा काढली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा ३० कोटी रूपयांचा निधी नगर पालिकेच्या विकास कामांकरिता खेचून आणण्यात आला आहे. याकरितासुद्धा कात्रटवार यांनी विशेष प्रयत्न केले होते. या सर्व निधीमधून गडचिरोली शहर विकासाला चालना मिळेल. तसेच शहरातील थंडबस्त्यात राहिलेली विविध विकास कामे लवकरच मार्गी लागतील, अशी आशा शहरवासीयांमध्ये व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)