शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांच्या समन्वयातून गावांचा विकास साधा

By admin | Updated: January 4, 2016 03:59 IST

देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली. मात्र गडचिरोली जिल्हा विकासात मागे आहे. याला समन्वय कारणीभूत

आमदारांचे आवाहन : रांगी येथे क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटनधानोरा : देशाला स्वातंत्र्य मिळून ६७ वर्षे उलटली. मात्र गडचिरोली जिल्हा विकासात मागे आहे. याला समन्वय कारणीभूत आहे. त्यामुळे बालक, पालक, शिक्षक, कर्मचारी यांच्या समन्वयातून प्रत्येक गावांचा विकास साधा, असे आवाहन आमदार डॉ. देवराव होळी यांनी केले. तालुक्यातील रांगी येथे रविवारी तालुकास्तरीय शालेय बाल क्रीडा व कला संमलेनाचे उद्घाटन पार पडले. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं.स. सभापती कल्पना वड्डे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून जि.प. सदस्य अ‍ॅड. गजानन दुगा, सुकमा जांगदुर्वे, केसरी उसेंडी, पं.स. सदस्य अशोक हलामी, परसराम पदा, जयलाल मार्गीया, जास्वंदा करंगामी, जोहरलाल मार्गीया, बशीरभाई पीर, रांगीचे सरपंच जगदिश कन्नाके, उपसरपंच नरेंद्र भुरसे, शशिकांत साळवे, प्रकाश काटेंगे, नारायण हेमके, दिलदारखॉ पठाण, शामराव बोरसरे, रमेश भुरसे, अविनाश महाजन, अनिल पोहणकर, प्राचार्य डी. के. मेश्राम, आश्रमशाळे मुख्याध्यापक मेश्राम, प्रा. राजकुमार शेंडे, मुख्याध्यापिका पालेवार, पोलीस पाटील रामचंद्र काटेंगे, के. जी. नेवारे, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग कोल्हे, अतिरिक्त बीडीओ कुळसंगे, गट शिक्षणाधिकारी रमेश उचे, विस्तार अधिकारी आखाडे, मडावी, खोब्रागडे, गावडे, सहारे आदी उपस्थित होते. धानोरा तालुक्यातील शाळा व मूत्रीघर बांधकामासाठी आ. डॉ. होळी यांनी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पं.स. सभापती कल्पना वड्डे यांनी यावेळी केली. प्रास्ताविक रमेश उचे, संचालन नरेश बाबोडे तर आभार केंद्रप्रमुख ताडाम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)१२ केंद्रातील ९६ संघ सहभागी४धानोरा तालुक्यात एकूण १२ केंद्र आहेत. या बाराही केंद्रातील मुलामुलींचे कबड्डी, खो-खो खेळाडूंचे ९६ संघ या तालुकास्तरीय क्रीडा संमेलनात सहभागी झाले आहेत. याशिवाय एका केंद्रातून दोन संघ असे एकूण २४ संघाचे खेळाडू सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. येथे तालुक्यातील शेकडो शिक्षकांनी हजेरी लावली आहे.