शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

क्षमता विकसित करा

By admin | Updated: August 1, 2014 00:17 IST

अध्यापन करतांना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले.

कुरखेडात कार्यशाळा : विनायक इरपाते यांचे प्रतिपादनकुरखेडा : अध्यापन करतांना प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकसीत करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते यांनी केले. स्थानिक गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या पर्वावर महाविद्यालय व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने इंग्रजी, मराठी, हिंदी व पाली या विषयांच्या सत्र ५ व ६ च्या अभ्यासक्रमासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन इरपाते यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दंडकारण्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राचार्य भैयासाहेब ठाकरे, तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.़ डी.व्ही़ नाईक, पदव्युत्तर हिंदी विभागाचे डॉ. प्रमोद शर्मा, गोडंवाना विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजाभाऊ मुनघाटे उपस्थीत होते़ याप्रसंगी बी. ए. भाग तीनच्या ‘अक्षरलेणी’ या मराठीच्या व ‘हनीडा’ या इंग्रजीच्या पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनीय भाषणात डॉ. विनायक इरपाते यांनी महाविद्यालयाच्या विकासात प्राचार्य आणि व्यवस्थापन सोबतच प्राध्यापकांची मोलाची भूमिका असते. त्यासाठी अशा कार्यशाळांचे आयोजन महत्वाचे ठरते असे प्रतिपादन केले़ आणि विद्यापीठांच्या विविध उपक्रमात क्रियाशील असल्याबद्दल महाविद्यालय व प्राचार्यांचे कौतुक केले़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोंडवाना विद्यापीठाच्या कला शाखेचे अधिष्ठाता तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी तर संचालन मराठी विभाग प्रमुख प्रा़ नरेंद्र आरेकर यांनी केले़ कार्यशाळा दोन सत्रात झाली. कार्यशाळेत विषयनिहाय मराठी व वाङ्मयाच्या अवलोकन सत्रात डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या अध्यक्षतेत डॉ. राजन जयस्वाल आणि डॉ. सुदर्शन दिवसे यांनी मार्गदर्शन केले. अभ्यासक्रमाची निवड व त्यातून उद्भवलेल्या अनेक प्रश्न सहभागी प्राध्यापक प्रतिनिधींनी मांडले़ इंग्रजीच्या विषयाच्या तांत्रिक सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. एल. व्ही. शेंडे आणि मार्गदर्शक म्हणून डॉ. टायटस व डॉ. वरकड यांनी मार्गदर्शन केले. हिन्दी विषयाच्या तांत्रिक सत्रामध्ये अध्यक्ष म्हणून डॉ. कल्पना कावळे आणि मार्गदर्शक म्हणून प्राचार्य डॉ. प्रभात दुबे मार्गदर्शन केले. कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील कला शाखेच्या विविध अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, कला शाखेच्या विविध विषयाचे प्राध्यापक, प्राचार्य उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)