शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

मूलभूत क्षमता विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:33 IST

शिक्षणाने माणूस प्रगल्भ व परिपूर्ण होतो. शिक्षणाच्या एकूण प्रमाणावर त्या देशाचे सांस्कृतीकरण, सामाजीकरण व राजकारणावर अवलंबून असतो. ही घडी नीट बसली तर देशाचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : विसोरा येथे मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षण

लोकमत न्यूज नेटवर्कमोहटोला (किन्हाळा) : शिक्षणाने माणूस प्रगल्भ व परिपूर्ण होतो. शिक्षणाच्या एकूण प्रमाणावर त्या देशाचे सांस्कृतीकरण, सामाजीकरण व राजकारणावर अवलंबून असतो. ही घडी नीट बसली तर देशाचा विकास कोणीही थांबवू शकत नाही. म्हणून शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही घडी नीट बसविण्याचे व लहान मुलांवर योग्य संस्कार करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य प्राथमिक शिक्षक करीत आहेत. शिक्षकांनी या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांचा मूलभूत वाचन क्षमता विकसीत कराव्या, असे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.विसोरा येथे मूलभूत वाचन क्षमता प्रशिक्षणाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी पं.स. सदस शेवंता अवसरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विसोराचे उपसरपंच नितीन बन्सोड, केंद्र प्रमुख विवेक बुध्दे, ब्रह्मानंद उईके, ज्ञानेश्वर नखाते उपस्थित होते.पुढे बोलताना आमदार गजबे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे पडू म्हणून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे अध्यापन करून त्यांच्यातील क्षमताचा विकास करावा. नवनवीन उपक्रम व प्रयोगाच्या माध्यमातून त्यांच्या बौध्दिक विकासास चालना द्यावी. तेव्हाच विद्यार्थी विकसीत होईल.प्रशिक्षणादरम्यान उपस्थित मार्गदर्शकांनीही विचार व्यक्त केले. केंद्रस्तरीय प्रशिक्षणात विसोरा, आमगाव, पोटगाव केंद्रातील ५५ शिक्षक सहभागी झाले. प्रास्ताविक केंद्र प्रमुख ब्रह्मानंद उईके यांनी केले. प्रशिक्षणाची पार्श्वभूमी तसेच गरज याबाबत त्यांनी माहिती दिली. संचालन दिलीप नाकाडे यांनी केले. सुलभक म्हणून होमा सहारे, राजेश परशुरामकर, घनश्याम लाडे, मेघा गिरीडकर, बंडू सिडाम यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणादरम्यान विषय साधन व्यक्ती अरविंद घुटके यांनी भेट देऊन पाहणी केली व माहिती जाणून घेतली. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी कर्मचाºयांनी सहकार्य केले.