शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कृषी तंत्रज्ञान विकसित होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:29 IST

जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करावयांच्या उपाययोजनांबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली.

ठळक मुद्देस्नेहा हरडे यांची माहिती : नागपूरच्या कृषी महाविद्यालयाला भेट

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कृषी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी करावयांच्या उपाययोजनांबाबत पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या नवनियुक्त कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी नागपूर येथील कृषी महाविद्यालयात भेट देऊन पाहणी केली.यावेळी शासकीय कृषी महाविद्यालय नागपूरचे प्राचार्य डॉ.एन. पालार्वार, यशोदीप संस्थेचे अध्यक्ष अरुण हरडे, सहाय्यक कुलसचिव डॉ. चव्हाण, डॉ. गावंडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात दोन कृषी महाविद्यालय असून या माध्यमातून शेतीबहूल असलेल्या जिल्ह्यात विद्यार्थ्यांनी आपल्या कृषी पदवी अभ्यासक्रमातून नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज लक्षात घेऊन स्नेहा हरडे यांनी नागपूर शासकीय महाविद्यालयातील विविध क्षेत्राचा आढावा घेतला. यावेळी प्रशासकीय भवन, वर्गखोल्या, परीक्षा खोल्या, इंग्रजकालिन वाचनालय, वर्कशॉप, प्रयोगशाळा, कॉन्फरन्स हॉल आदींची माहिती अवगत केली. विशेष म्हणजे, १९०६ मध्ये इंग्रजांनी देशात पाच शासकीय कृषी महाविद्यालय स्थापन केले होते. त्यात नागपूर येथील महाविद्यालयाचा समावेश होता. या महाविद्यालयात इंग्रज राणी व्हिक्टोरिया हिच्या आगमनाप्रित्यर्थ व्हिक्टोरिया टेक्नीकल इंस्टिट्युट सायंटिफिक लायब्ररीची स्थापना करण्यात आली होती. या लायब्ररीत अनेक पुरातन अवलोकनार्थ पुस्तके उपलब्ध आहेत. या पुस्तकाचा आजही विदेशी तरुण लाभ घेतात. या लायब्ररीत असलेल्या पुस्तकांविषयी स्नेहा हरडे यांनी माहिती अवगत करून घेतली. तसेच इंग्रज राजवटीत देशामध्ये आढळणाऱ्या विविध वनस्पती, कीटक, मध व इतर वस्तुंचे संकलन या ठिकाणी जतन करून ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने देश स्वातंत्र्य झाला त्यावर्षीचे मध, १९४८ ची राणीमाशी, विविध प्रकारचे फुलपाखरू आदी संग्रहित आहेत. असे संकलन जिल्ह्यात धानपिकांवर आढळणारे विविध कीटकांचे करण्याचा मानस असून पशुपालनातून होणारी क्रांतीसुद्धा महत्त्वाची असल्याने आगामी काळात दोन्ही महाविद्यालयात अशा योजना कार्यान्वित करण्याचा संकल्प कार्यकारी परिषद सदस्य स्नेहा हरडे यांनी केला आहे.

टॅग्स :agricultureशेती