मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनगडचिरोली : तीन टक्के आरक्षण देऊन शहरी व ग्रामीण अपंगांना जागेसहित घरकूल देण्यात यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील अपंगांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले.या निवेदनात अपंगांसाठी संजय गांधी निराधार योजनेत उत्पन्नाची अट नसावी, मासिक भत्ता तीन हजार रूपये करण्यात यावा, अपंगांच्या विशेष शाळांकडे लक्ष देण्यात यावे, अपंग मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे, सुशिक्षित अपंग बेरोजगारांना कर्ज देण्यात यावे, प्रलंबित कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच आमदार, खासदाराच्या निधीतून तीन टक्के रक्कम अपंगांच्या विकासावर खर्च करण्यात यावा, ग्रामीण व शहरी भागात व्यवसायासाठी बांधण्यात आलेले दुकान गाळे अपंगांना मोफत उपलब्ध करून देण्यात यावे, पोलिओ असणाऱ्या अपंगांना कायम प्रमाणपत्र देण्यात यावे, अपंगांना अपंग म्हणून चिडविल्यास संबंधितांवर अॅट्रासिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा, दरवर्षी अपंग कर्मचाऱ्यांच्या अनुशेषाची माहिती शासनाने मागावी, आदी मागण्यांचा समावेश आहे. निवेदन देतांना देसाईगंज येथील वर्षा नांदगावे, प्रमोद नांदगावे, मुकुंदा उंदीरवाडे, भूपेंद्र हिरवाणी, शत्रुगण गावतुरे, भजन उईके, महेंद्र चाहाळे उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
अपंगांच्या समस्या मार्गी लावा
By admin | Updated: July 8, 2014 23:29 IST