शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

एफडीसीएम रोपवनातील झाडे नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 22:29 IST

कुरखेडा तालुक्यातील शिरपूर कक्ष क्रमांक ७९ व ८३ (अ) मधील घनदाट जंगल तोडून त्या ठिकाणी सागाचे रोपवन लावले. परंतु त्यातील बहुतेक रोपटे नष्ट झाली आहेत.

ठळक मुद्देशिरपूर बिट : वन सीमांचे निर्धारण न झाल्याची दिली चुकीची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : कुरखेडा तालुक्यातील शिरपूर कक्ष क्रमांक ७९ व ८३ (अ) मधील घनदाट जंगल तोडून त्या ठिकाणी सागाचे रोपवन लावले. परंतु त्यातील बहुतेक रोपटे नष्ट झाली आहेत.पेसा क्षेत्रांतर्गत येणारे वनक्षेत्र ग्राम समित्यांच्या संमतीशिवाय वने, वन्यजीव आणि जैव विविधतेची कोणतीही हानी करता येणार नाही, असे नियमात असताना वनाधिकार कायद्याचे उल्लंघन करून एफडीसीएमने मोठ्या प्रमाणात जंगलाची हानी केली. एफडीसीएमने घनदाट जंगलातील लहान-मोठी झाडे तोडून जंगल सपाट केल्याने सर्वत्र ओसाड माळरान दिसून येते. विशेष म्हणजे, परिसरातील जंगलातून प्राप्त वनोपजावर येथील लोकांची उपजिविका अवलंबून होती. त्यांना गौण वनोपज मिळत होते. त्यामुळे शिरपूर, भगवानपूर, चिखली, सावलखेडा, सालमारा येथील नागरिकांनी एफडीसीएमविरोधात एल्गार पुकारून वृक्षतोड बंद पाडली होती. गाव समित्या व एफडीसीएमच्या अधिकाऱ्यांची उपवनसंरक्षक कार्यालय वडसा येथे संयुक्त बैठक झाली. या बैठकीत एफडीसीएमचे विभागीय व्यवस्थापक राजपूत यांनी गाव समित्यांची दिशाभूल करणारी माहिती दिली. ज्या जंगलात एफडीसीएमने वृक्षतोड केली. ते जंगल कोणत्याही गावाच्या सीमेत येत नाही. पण जिल्ह्यात वन सीमांचे निर्धारण नाही असे जंगल नाही. परंतु एफडीसीएमने वन विभागाशी संगनमत करून अधिक घनता असलेले जंगल हस्तांतरित करून जंगलाची फार मोठी हानी केली. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. वयस्क व वठलेले वृक्ष तोडणे आवश्यक असतानाही एफडीसीएफमार्फत सरसकट जंगलाची तोड केली जात आहे. त्यामुळे मौल्यवान वनसंपदा नष्ट होत आहे. स्थानिक नागरिकांकडून या वृक्षतोडीला विरोध असतानाही या विरोधाला न जुमानता एफडीसीएमने वृक्षतोडीची कार्यवाही करीत आहे. मागील वर्षी वैरागड येथील नागरिकांनी एफडीसीएमच्या वृक्षतोडीला विरोध केला होता. तसेच देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव परिसरात नागरिकांनी विरोध दर्शविला होता.एफडीसीएम नागरिकांची दिशाभूल करीत असून गाव हद्दीबाहेर जंगल अशी वन विभागात परिभाषा नाही. पेसा क्षेत्रात अशा शब्दाचा उल्लेखनही नाही. एफडीसीएमला ज्या वनाधिकाºयांनी हे जंगल हस्तांतरित केले त्या वनाधिकाºयांवर कारवाई करावी.- केशव गुरनुले, संचालक, सृष्टी निसर्ग संस्था शंकरपूर

टॅग्स :forest departmentवनविभाग