शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंजातील गाळे रिकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:46 IST

स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही.

ठळक मुद्देलाखोंचा खर्च पाण्यात : स्वर्ण जयंती ग्राम योजनेअंतर्गत बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही.शहरामध्ये अनेक बेरोजगार युवक व्यवसाय करण्यासाठी तयार असतात. मात्र व्यवसाय करण्यासाठी आवश्यक दुकानगाळे उपलब्ध होत नाही. दुकानाची इमारत भाड्याने घेण्यासाठी लाखो रूपये मोजावे लागतात. सुशिक्षित बेरोजगारांना दुकानाच्या इमारती उपलब्ध व्हाव्या, यासाठी शासनाने स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शहरात दुकान गाळे बांधले जातात. देसाईगंज येथे जुन्या पंचायत समितीच्या दर्शनी भागात २००९ मध्ये पाच गाळ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत सदर गाळे भाड्याने देण्यात आले नाही. पंचायत समितीच्या दर्शनी भागात सदर गाळे असल्याने झेरॉक्स मशीन, स्टेशनरी व हॉटेल यासारखी दुकाने सहज चालू शकतात. मात्र बेरोजगार युवकही सदर गाळे भाड्याने घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ज्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत, तेथील जागेचे भाव कोट्यवधी रूपयांच्या घरात आहेत. मागील आठ वर्षांच्या कालावधीत पंचायत समितीने या गाळ्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे कायमचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गाळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या गाळ्यांच्या भिंती व शटरला रंगरंगोटी झाल्यास बेरोजगार युवक दुकान टाकण्यास तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील बहुतांश गाळ्यांची विदारक स्थितीसुवर्ण ग्राम जयंती योजने अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे दुकान गाळ्यांना भाडेकरू मिळणार की नाही, याचा विचार न करता शासनाकडून आलेले पैसे केवळ खर्च करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने गाळ्यांचे बांधकाम केले आहे. मात्र आठ ते नऊ वर्षांपासून दुकान गाळे भाडेकरूविना पडून आहेत. त्यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च वाया गेला आहे. सदर गाळे बेरोजगारांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.