शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

गडअहेरीवासीयांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: July 25, 2016 01:34 IST

अहेरी नगर पंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे नळ पाणी पुरवठा योजनेची दोन ते तीन वर्षापूर्वी योजनेची पाणी टाकी बांधण्यात आली.

पावसाळ्यात पाणीटंचाई : नळ योजना व हातपंप बंद अहेरी : अहेरी नगर पंचायतीच्या क्षेत्रात येणाऱ्या गडअहेरी येथे नळ पाणी पुरवठा योजनेची दोन ते तीन वर्षापूर्वी योजनेची पाणी टाकी बांधण्यात आली. मात्र सदर नळ योजना बंद आहे. तसेच येथील हातपंपही बंद आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गडअहेरी परिसरात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना पाण्यासाठी एक किमीची पायपीट करावी लागत आहे. गडअहेरी येथे दोन ते तीन हातपंप आहे. मात्र सदर हातपंप बंद असल्याने येथून पाणी येत नाही. प्रकाश गलबले यांच्या घराजवळील असलेले हातपंप बसविल्या दिवसापासून बंद आहे. याशिवाय येथील नळ पाणी पुरवठा योजना बंद असून पाण्याची टाकी शोभूची वस्तू बनली आहे. त्यामुळे महिलांना पिण्याचे पाणी अहेरी येथून न्यावे लागत आहे. तसेच इतर कामाच्या वापरासाठीचे पाणी गडअहेरी नाल्यावरून आणावे लागत आहे. ७ ते १३ जुलैदरम्यान अहेरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात संततधार पाऊस बरसला. ऐन पावसाळ्यात गडअहेरी येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने नागरिकांनी अहेरी नगर पंचायत प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला आहे. बंद पडलेली गडअहेरी येथील पाण्याची टाकी सुरू करण्यात यावी, तसेच बंद असलेले हातपंप तत्काळ दुरूस्त करण्यात यावी, अशी मागणी गडअहेरी येथील नागरिकांनी केली आहे. (प्रतिनिधी) नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष अहेरी नगर पंचायतीच्या हद्दीत गडअहेरी हा परिसर येतो. या परिसरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. नळ पाणी पुरवठा योजना व हातपंप बंद असल्याने येथे ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात तक्रार करूनही अहेरी नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात आली नाही. प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.