शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

देसाईगंज, गडचिरोली न. प. ची सदस्य संख्या निश्चित

By admin | Updated: May 27, 2016 01:24 IST

राज्य शासनाच्या नगर परिषद विभागाने यंदाच्या अखेरीस निवडणुका होणाऱ्या नगर परिषदांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे.

गडचिरोली : राज्य शासनाच्या नगर परिषद विभागाने यंदाच्या अखेरीस निवडणुका होणाऱ्या नगर परिषदांची सदस्यसंख्या निश्चित केली आहे. गडचिरोली नगर परिषदेची सदस्यसंख्या दोनने वाढली असून, आता ती २५ झाली आहे. देसाईगंज नगरपरिषदेची सदस्यसंख्या एकने वाढली असून, आता तेथे १८ नगरसेवक असणार आहेत.महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम ९(२) मधील तरतुदीस अनुसरुन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (एससी, एसटी व ओबीसी लोकसंख्येसह) गडचिरोली व देसाईगंज नगरपरिषद क्षेत्रांची सदस्यसंख्या निश्चित करण्यात आली आहे. सध्या गडचिरोली नगरपरिषदेत २३ नगरसेवक आहेत. आता त्यात दोनने वाढ होऊन २५ नगरसेवक असणार आहेत. देसाईगंज नगरपरिषदेत सध्या १७ नगरसेवक आहेत. त्यात एकने वाढ झाली असून, आता तेथे १८ नगरसेवक होतील.याबरोबरच स्त्री सदस्य तसेच अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गांची आरक्षित सदस्य संख्याही निश्चित करण्यात आली आहे. नव्या रचनेनुसार, 'ब' वर्गात मोडणाऱ्या गडचिरोली नगर परिषदेच्या २५ नगरसेवकांपैकी १३ जागा स्त्रियांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी प्रत्येकी ४ जागा व नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी ७ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या १३ जागांपैकी प्रत्येकी २ जागा अनुसूचित जाती जमातीच्या स्त्रियांसाठी, ४ जागा नागरिकांच्या मागास प्रवगार्तील स्त्रियांसाठी, तर ५ जागा सर्वसाधारण प्रवगार्तील स्त्रियांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत. 'क' वर्गात मोडणाऱ्या देसाईगंज नगर परिषदेच्या १८ नगरसेवकांपैकी ९ जागा स्त्रियांसाठी राखीव झाल्या आहेत. अनुसूचित जातीसाठी ३ जागा, अनुसूचित जमातीसाठी १ जागा व नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी ५ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. स्त्रियांसाठी राखीव असलेल्या ९ जागांपैकी २ जागा अनुसूचित जातीच्या स्त्रियांसाठी, ३ जागा नागरिकांच्या मागास प्रवगार्तील स्त्रियांसाठी, तर ४ जागा सर्वसाधारण प्रवगार्तील स्त्रियांसाठी राखीव करण्यात आल्या आहेत.