शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाच्या दफ्तरदिरंगाईने लोहखनिज प्रकल्प अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 23:57 IST

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाºयांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांचा आडमुठेपणा : लिज असूनही ताबा देण्यास टाळाटाळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या एकमेव लोहखनिज प्रकल्पाचे स्वप्न वनाधिकाऱ्यांच्या आडमुठेपणामुळे भंगणार की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. खाणीची लिज मिळालेली असताना आणि वनकायद्याच्या सर्व अटींची पूर्तता झालेली असतानाही वनविभागाकडून जमीन ताब्यात देण्यासाठी कानाडोळा केला जात आहे. परिणामी एटापल्ली तालुक्यातील सुरजागडमधील लोहखनिज कसे काढायचे, असा प्रश्न लॉयड्स मेटल्सपुढे निर्माण झाला आहे.सुरजागड पहाडावरील ३४८ हेक्टर जमीन शासनाने लॉयड्स मेटल्स कंपनीला लिजवर दिली आहे. परंतू या कंपनीला आतापर्यंत पहिल्या टप्प्यात केवळ ४ हेक्टर तर दुसऱ्या टप्प्यात १० हेक्टर अशी केवळ १४ हेक्टर जमीन ताब्यात दिली आहे. आणखी १० हेक्टर जमीन ताब्यात द्यावी यासाठी वर्षभरापासून वनविभागाकडे मागणी केली जात आहे. पण भामरागड वनविभागाच्या उपवनसंरक्षकांकडून या ना त्या कारणांनी टाळाटाळ केली जात आहे. परिणामी सदर कंपनी हा प्रकल्प बंद करण्याच्या मानसिकतेत येऊन पोहोचली आहे.मुख्यमंत्र्यांनी स्वत: येऊन ज्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली त्या प्रकल्पाला शासनानेच अधिकारी वाटाण्याच्या अक्षता लावून जिल्हावासियांचे स्वप्न धुळीस मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. यासंदर्भात भामरागडचे उपवनसंरक्षक बाला यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.सर्व अडचणी दूर करणार- खारगेयासंदर्भात राज्याच्या वनविभागाचे प्रधान सचिव तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांना विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबद्दल अनभिज्ञ असल्याचे सांगितले. मात्र हा प्रकल्प जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असल्यामुळे वनकायद्याच्या अधीन राहून वनविभागाकडून येणाºया अडचणी दूर केल्या जातील. त्याबाबतची माहिती आजच मुख्य वनसंरक्षकांकडून घेऊन योग्य ते निर्देश दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :forest departmentवनविभाग