शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीस संस्थांचा नकार

By admin | Updated: November 24, 2014 22:58 IST

परिसरात रेगडी, मकेपल्ली, अड्याळ व घोट येथे धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. मात्र महामंडळाच्या तसेच शासनाच्या अटी व शर्ती मान्य नसल्याने येथील विविध कार्यकारी संस्थांनी

महामंडळाचा पुढाकार : आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना अटी मान्य नाहींघोट : परिसरात रेगडी, मकेपल्ली, अड्याळ व घोट येथे धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. मात्र महामंडळाच्या तसेच शासनाच्या अटी व शर्ती मान्य नसल्याने येथील विविध कार्यकारी संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू करण्यास नकार दिला आहे. परिणामी आदिवासी विकास महामंडळाने धान खरेदी करावे, अशा मागणीचे पत्र उपप्रादेशिक कार्यालय घोटतर्फे आदिवासी विकास महामंडळाला पाठविले आहे.गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आदिवासी विविध कार्यकारी संस्थांच्यामार्फतीने धान खरेदी करते. मात्र यावर्षी महामंडळाने तसेच राज्य शासनाने धान खरेदीसाठी अनेक जाचक अटी आदिवासी विविध कार्यकारी संस्थांसमोर ठेवल्या आहेत. या अटी व शर्तीनुसार धान खरेदी केल्या आदिवासी विविध कार्यकारी संस्थांना तोट्याचाच सामना करावा लागणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घोट, रेगडी, मकेपल्ली, अड्याळ येथे धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात १९ नोव्हेंबर रोजी आदिवासी विविध कार्यकारी संस्थांचे सचिव व सभापती यांची बैठक आयोजित केली गेली होती. या बैठकीत महामंडळाच्या अटी व शर्ती मान्य नाहीत. त्याचबरोबर कमिशन कमी मिळत असल्याच्या कारणावरून धान खरेदीस नकार दिला. या चारही ठिकाणी कृषी गोदामे असून खरेदी केलेले धान साठविण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महामंडळाने मागे-पुढे जरी याठिकाणच्या धानाची उचल केली तरी कृषी गोदामात धान सुरक्षित राहत असल्याने तोट्याचा सामना करावा लागणार नाही. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाने पुढाकार घेऊन धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी घोट उपप्रादेशिक कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी महामंडळाकडे केली आहे. मागणीसोबतच हुंडी लिमिट प्रस्तावसुद्धा शासनास जोडला आहे. महामंडळाच्या मान्यतेनंतर चार ते पाच दिवसात या ठिकाणी धान खरेदी केंद्र सुरू होतील, अशी माहिती लोकमतशी बोलताना उपप्रादेशिक कार्यालयाच्या व्यवस्थापकांनी दिली. धान खरेदी केंद्र सुरू झाल्यास खासगी व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबण्यास फार मोठी मदत होईल. (वार्ताहर)