शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

शिवराजपुरात डेंग्यूची लागण

By admin | Updated: June 28, 2015 02:17 IST

तालुक्यातील शिवराजपूर येथे गुरूवारपासून नागरिकांना डेंग्यू रोगाची लागण झाली असून आतापर्यंत या गावात १५ डेंग्यूबाधीत रूग्ण आढळले आहेत.

पाच रूग्ण आढळले पॉझिटिव्ह : आतापर्यंत गावात डेंग्यूबाधित १५ रूग्णदेसाईगंज : तालुक्यातील शिवराजपूर येथे गुरूवारपासून नागरिकांना डेंग्यू रोगाची लागण झाली असून आतापर्यंत या गावात १५ डेंग्यूबाधीत रूग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे, पाच रूग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोग्य व्यवस्था ढासळली असल्याचे दिसून येत आहे. शिवराजपूर गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णांमध्ये विकास सुरेश दिवटे (२०), अक्षय सुरेश दिवटे (१६), जलील जब्बार शेख (३२), रोशण प्रल्हाद सोनवाने व सुशील वामन साखरकर आदींचा समावेश आहे. दोन रूग्ण गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात तर दोन रूग्ण ब्रह्मपुरी येथे उपचार घेत आहेत तसेच १० रूग्ण देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात उपचार घेत आहेत. देसाईगंजच्या रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये विनोद सोनवाणे (३२), मिलिंद रामटेके (३२), मीनाक्षी बुराडे (२४), अल्का सोनवाणे (१९), विद्या सूर्यवंशी (३६), वैभव झिलपे (१३), औसतराम बरडे (५५), पुरूषोत्तम कार (३०) आदींचा समावेश आहे. जलील शेख (३२) व खर्जाना शेख (२८) हे दोन रूग्ण गडचिरोलीच्या रूग्णालयात तर विकास दिवटे व अजय दिवटे यांना ब्रह्मपुरीच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. शिवराजपूर गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले नाही. या गावात नाली स्वच्छता व औषध फवारणीसुध्दा झाली नाही. परिणामी अस्वच्छतेमुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असल्याने डेंग्यूची लागण झाली आहे. शिवराजपूर येथील डेंग्यूबाधीत १५ रूग्ण आढळूनही आरोग्य विभागाच्या वतीने गावात विशेष आरोग्य शिबिर लावण्यात आले नाही. पिण्याच्या स्त्रोतांचे तपासणीसाठी नमुने घेण्यात आले नाही. डेंग्यू रोगाची लागण झाल्याने तालुक्याच्या आरोग्य विभागात खळबळ माजली आहे. (वार्ताहर)आमदाराची देसाईगंज रूग्णालयाला भेटशिवराजपूर गावातील अनेक रूग्ण डेंग्यू रोगाने बाधीत असून ते देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असल्याची माहिती मिळताच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी शनिवारी देसाईगंजच्या ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. तसेच उपचारासाठी दाखल झालेल्या डेंग्यूबाधीत रूग्णांची आस्थेने विचारपूस केली. रूग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचाराची रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. शिवराजपूर गावातील डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने तत्काळ शिवराजपूर गावात विशेष आरोग्य शिबिर लावण्यात यावे, तसेच गावात फवारणी करण्यात यावी, डेंग्यूबाधीत रूग्णांवर योग्य औषधोपचार करण्यात यावा, अशा सूचना आमदार क्रिष्णा गजबे यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाटील व वैद्यकीय अधिकारी नरेंद्र खोमा यांना यावेळी दिल्या.