शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

साखरीटोला परिसरातील गावात डेंग्यूचा कहर

By admin | Updated: September 1, 2014 23:35 IST

सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

साखरीटोला : सालेकसा तालुक्यातील कोटरा गावाच्या पाठोपाठ आता साखरीटोला परिसरातील अनेक गावांत डेंग्यूने थैमान घातल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच साखरीटोला गावाला लागून असलेल्या आमगाव व सालेकसा तालुक्यातील अनेक गावे डेंग्यूच्या विळख्यात सापडली आहेत. यात तिगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या वडद, सोनेखारी, कवडी, कन्हारटोला, रामपूर, अंजोरा गावात डेंग्यूचे बरेच रुग्ण आढळले. तर सातगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सलंगटोला, चर्जेटोला येथे डेंगुचे रुग्ण आढळल्याची माहिती अहे. त्यामुळे परिसरात डेंग्यू आजाराचे तैमान सुरू असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अजून काही गावे डेंग्यूच्या कचाट्यात सापडण्याची चिन्हे आहेत.वेळीच उपाययोजना न केल्यास संपूर्ण परिसर डेंग्युमय होऊ शकतो. याकडे आरोग्य विभागाने लक्ष घालून प्रतिबंधात्मक उपाय करण्याची मागणी केली जात आहे. कोटरा गावाला वगळले तर या संपूर्ण गावाकडे आरोग्य विभागाचे सपशेल दुर्लक्ष आहे.प्राप्त माहितीनुसार, कोटरा गावातील लीलाधर क्षीरसागर, दिपाली बोहरे, मानीकचंद मानकर, सलंगटोला येथील रंजित दाते, मधू दोनोडे, ललित दोनोडे, सोनेखारी येथील योगेश्वरी पटले, कवडी येथील आशीष साखरे, अक्षय उईके, अंजोरा येथील कांची राणे, राहुल रहांगडाले, भूमेश्वर रहांगडाले, वैशाली अंबुले, तिरखेडी येथील योगेश्वरी मडावी, वडद येथील शालिकराम पारधी, रामपूर येथील उदल बहेकार, कन्हारटोला येथील रमेश तांडेकर, मुकेश ताडेकर, सुनील रहिले, बालू ब्राह्मणकर, चर्जेटोला येथील मनोहर चर्जे, वंदना चर्जे, स्वाती चर्जे, मयाराम चनाप, डेंग्यूसारख्या आजाराने ग्रस्त असून यातील बरेच रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याची माहिती आहे.काही रुग्ण गोदियाच्या केटीएस रुग्णालयात उपचार घेत आहेत. अंजोरा गावातील बरेच रुग्ण गोंदिया येथील खासगी रुग्णालयात तर काही साखरीटोला येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. बऱ्याच दिवसांपासून पाऊस न पडल्याने वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे तापाचे प्रमाण वाढले. मात्र यात डेंग्यूग्रस्त रुग्णांची संख्या अधिक असल्याचे जानवते. विविध रोगाने आजारी रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी डॉक्टरांची चांदी आहे. या परिस्थितीमुळे असे लक्षात येते की शासनाचे आरोग्य विभागावर कोट्यवधी रुपये खर्च करीत असले तरी प्रत्यक्षात मात्र रोगावर आळा घालण्यास यंत्रणा कुचकामी ठरत आहे. यामुळे लोकांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. (वार्ताहर)