शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या मुद्यावर निदर्शने

By admin | Updated: April 7, 2016 01:17 IST

भाजप प्रणित केंद्र सरकारने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोकांचा कुठलाही विचार न करता वर्षातून अनेकदा पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे.

भाजपकडून सर्वसामान्यांची दिशाभूल : सरकारच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर गडचिरोली : भाजप प्रणित केंद्र सरकारने सर्वसामान्य व मध्यमवर्गीय लोकांचा कुठलाही विचार न करता वर्षातून अनेकदा पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली आहे. मंगळवारी केंद्रसरकारने पेट्रोल व डिझेलच्या दरात आणखी तीन रूपयांनी वाढ केली. या दरवाढीच्या मुद्यावर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात बुधवारी येथील इंदिरा गांधी चौकात जोरदार निदर्शने करण्यात आली. दरम्यान भाजप प्रणित केंद्र सरकार सर्वसामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहे, असा प्रखर आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला. या निदर्शनाचे नेतृत्त्व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, प्रदेश सरचिटणीस हसनअली गिलानी, ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, रवींद्र दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, युकाँचे नेते पंकज गुड्डेवार, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, लोकसभा क्षेत्र अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी केले. भाजप प्रणित केंद्र सरकारच्या विरोधात प्रखर शब्दांत नारेबाजी करून तसेच बॅनर झळकवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनहितवादी धोरणाचा काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. काँग्रेसच्या भांडवलदारहिताच्या धोरणामुळे गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्र व भारत देशातील सर्वसामान्य नागरिकांची गळचेपी होत आहे, अशी टिका माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी यावेळी केली.याप्रसंगी जि. प. सदस्य केसरी उसेंडी, नंदू वाईलकर, प्रभाकर वासेकर, पांडुरंग घोटेकर, पी. आर. आकरे, वैभव भिवापुरे, विजय शातलवार, आरती लहरी, पं. स. सदस्य जास्वंदा करंगामी, मंगला कोवे, सी. बी. आवळे, पी. टी. मसराम, अमिता मडावी, प्रतिभा जुमनाके, बालाजी गावळे, मिलींद खोब्रागडे, रजनीकांत मोटघरे, नीतेश राठोड, ज्योती गव्हाणे, मंदा तुरे, रेखा मडावी, जि. प. सदस्य शांता परसे, प्रेमिला कुमरे, सुनंदा कटकमवार, चंदू वडपल्लीवार आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.