लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाभरातील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, निमसरकारी, चतुर्थ श्रेणी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी तालुकास्तरावर निदर्शने देऊन शासनाचे लक्ष वेधले.अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. कंत्राट व मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमित करावे. महामंडळे, नगर पालिका, महानगर पालिका, शैक्षणिक संस्था, विविध प्रकल्पांमधील रिक्त पदे तत्काळ भरावी, कोविड योध्द्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून द्यावी. मार्च महिन्याचे कपात केलेले वेतन त्वरीत द्यावे. महागाई भत्ता गोठवू नये. सातव्या वेतन आयोगाचा दुसरा टप्पा एक वर्षासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा. मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना १० लाख रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. चामोर्शी पंचायत समिती समोर निदर्शने दिली. आंदोलनाचे नेतृत्व ग्रामसेवक युनियनचे माजी अध्यक्ष देवानंद फुलझेले, तालुका अध्यक्ष यादव मुळे, सचिव इंद्रावण बारसागडे, ज्ञानेश्वर भोगे, मदन काळबांधे, महेंद्र येलावार, अभय कार्सलावार, अमित दुधबळे, मनिषा खोबरे, स्वप्नील रायपुरे, दिगांबर पेंटीवार, अंकिता पन्नासे, शीतल आकरे यांनी केले. गडचिरोली, एटापल्ली, धानोरा, कोरची येथे सुध्दा आंदोलने करण्यात आली.
जिल्हाभरात कर्मचाऱ्यांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST
अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी. कंत्राट व मानधनावरील कर्मचाºयांना सेवेत नियमित करावे. महामंडळे, नगर पालिका, महानगर पालिका, शैक्षणिक संस्था, विविध प्रकल्पांमधील रिक्त पदे तत्काळ भरावी, कोविड योध्द्यांच्या सुरक्षिततेसाठी पुरेसे सुरक्षा उपकरणे उपलब्ध करून द्यावी. मार्च महिन्याचे कपात केलेले वेतन त्वरीत द्यावे. महागाई भत्ता गोठवू नये.
जिल्हाभरात कर्मचाऱ्यांची निदर्शने
ठळक मुद्देपंचायत समितीसमोर आंदोलन : महागाई भत्ता गोठवू नका, जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी