शहरं
Join us  
Trending Stories
1
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
2
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
3
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
4
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
5
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
6
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ५७,५०९ कोटींच्या पुरवणी मागण्या
7
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
8
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
9
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
10
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
11
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
12
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
13
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
14
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
15
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
16
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
17
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
18
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
19
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
20
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव

अहेरी कोर्टासमोर निदर्शने; आरोपीची कोठडीत रवानगी

By admin | Updated: December 16, 2014 22:52 IST

भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील २२ वर्षीय युवती संगिता जोगा मडावी हिला जाळून मारल्या प्रकरणी वनरक्षक पदावर कार्यरत आरोपी मनोज सखाराम सडमेक याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी,

वनरक्षकाने युवतीला जाळल्याचे प्रकरण अहेरी : भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील २२ वर्षीय युवती संगिता जोगा मडावी हिला जाळून मारल्या प्रकरणी वनरक्षक पदावर कार्यरत आरोपी मनोज सखाराम सडमेक याला मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी येथील तालुका न्यायालयासमोर आज शेकडो आंदोलक व मृतक युवतीच्या नातलगांनी ठिय्या आंदोलन केले. यानंतर सदर आरोपीचे वकीलपत्र घेण्यास कुणीही विधीज्ज्ञ धजावले नाहीत. त्यामुळे आरोपी मनोज सखाराम सडमेकला अहेरी येथील तालुका न्यायालयाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. संगीता जोगा मडावी या युवतीची हत्या आरोपी वनरक्षक मनोज सखाराम सडमेक याने केली. या प्रकरणी त्याच्या विरोधात अहेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज मृत मुलीचे वडील जोगा व्यंका मडावी, काका सिताराम व्यंका मडावी, सामाजिक कार्यकर्ते रामशहा पोचम मडावी, पं.स. सदस्य ऋषी पोरतेट, कैलाश कोरेत, संतोष आत्राम आदींसह शेकडो नागरिकांनी अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा द्या या मागणीचे निवेदन त्यांना सादर केले. दुपारी २.३० वाजतापासून आंदोलन सुरू झाले. दरम्यान दुपारी ३ वाजता अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून असलेल्या अहेरी न्यायालयात आरोपीला पोलिसांनी हजर करताच आंदोलकांचा लोंढा कोर्टाच्या दिशेने वळला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जात आहे हे लक्षात आल्यावर अतिरिक्त पोलीस कुमक बोलाविण्यात आली. यावेळी आरोपीचे वकीलपत्र घेणाऱ्या वकीलाच्या विरोधात नारेबाजी आंदोलकांनी केली. त्यानंतर सर्व वकीलांनी आरोपी मनोज सडमेकचे वकीलपत्र नाकारले व दुपारी ४ वाजेपर्यंत शेकडो नागरिक न्यायालयाच्या बाहेर परिसरात ठिय्या मांडून होते. आरोपी पोलीस कोठडीत रवाना झाल्यानंतर आंदोलक पांगण्यास सुरूवात झाली.