शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेला नृत्यातून संस्कृतीचे प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 23:24 IST

उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी वन विभागाच्या पटांगणावर आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धा पार पडल्या.

ठळक मुद्देभामरागडात स्पर्धा : उपविभागीय पोलीस अधिकाºयांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या वतीने बुधवारी वन विभागाच्या पटांगणावर आदिवासी पारंपरिक रेला नृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत अनेक संघांनी रेला नृत्य सादर करीत आदिवासी संस्कृतीचे प्रदर्शन केले.रेला नृत्य स्पर्धेत भामरागड पोलीस ठाण्याचा एक संघ, लाहेरी उपपोलीस ठाण्याचा एक, पोलीस मदत केंद्र धोडराज येथील एक संघ, ताडगाव पोलीस मदत केंद्रातील एक संघ, नारगुंडा पोलीस मदत केंद्रातील एक, कोठी पोलीस मदत केंद्रातील एक संघ सहभागी झाला. या स्पर्धेत प्रथम क्रमांक उपपोलीस ठाणे लाहेरीच्या संघाने पटकाविला. द्वितीय क्रमांक धोडराज पोलीस मदत केंद्रातील मेडपल्ली गावच्या संघाने तर तृतीय क्रमांक पोलीस मदत केंद्र कोठीच्या संघाने पटकाविला. प्रथम क्रमांकाच्या संघास सात हजार रूपये, द्वितीय क्रमांक पटकाविणाºया संघास पाच हजार तर तृतीय क्रमांक पटकाविणाºया संघास तीन हजाराचे रोख बक्षीस देण्यात आले. दरम्यान परिक्षण पर्यवेक्षक गावतुरे, मेथे, चांदेकर यांनी केले.याप्रसंगी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, सीआरपीएफ ३७ बटालीयनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्रसिंह, भामरागड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी अंजली राजपुत, एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक वाघमारे, जि. प. सदस्य अ‍ॅड. लालसू नगोटी, पं. स. सभापती सुकराम मडावी, उपसभापती प्रेमिला कुड्यामी, नगराध्यक्ष राजू वड्डे, मुख्याधिकारी चव्हाण, डॉ. प्रणय मंडल, मोडक, सय्यद, तरारे, गोमासे, विजय दोनाडकर, भूमकाल संघटनेचे दत्ता सिर्के, परसलवार उपस्थित होते. संचालन पीएसआय शिवराज हाळे तर आभार अंजली राजपुत यांनी मानले. यशस्वीतेसाठी पीएसआय बैसाने, राळेभात, मुजूमदार व पोलीस जवानांनी सहकार्य केले.