शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
2
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
3
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
4
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
5
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
6
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...
7
'डियर क्रिकेट... डोन्ट गिव्ह वन मोअर चान्स' असं म्हणायची वेळ! करुण नायर चौथ्या प्रयत्नातही 'नापास'
8
Devendra Fadnavis on Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचे आशीर्वाद आज मलाच मिळत असतील- देवेंद्र फडणवीस
9
Sushil Kedia Office Vandalise: सुशील केडिया यांच्या मुंबईतील कार्यालयाची तोडफोड, मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक
10
Himachal Flood : पावसाचे थैमान! ७२ जणांचा मृत्यू, ३७ बेपत्ता; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळे नुकसान, रेड अलर्ट जारी
11
PNB घोटाळ्यातील फरार आरोपी नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदी अटकेत, अमेरिकेत आवळळ्या मुसक्या   
12
Raj Thackeray Uddhav Thackeray Vijayi Melava Marathi : "अडवाणी ख्रिश्चन मिशनरी स्कूलमध्ये शिकले, त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेऊ का?"; राज ठाकरेंनी यादीच वाचली...
13
धक्कादायक! दुधात थुंकायचा आणि तेच लोकांना द्यायचा; किळसवाणा प्रकार CCTV मध्ये कैद
14
इंग्लंडनं २४ चेंडूत गमावल्या ९ विकेट्स! टीम इंडियानं अखेरच्या षटकात हातात आलेली मॅच घालवली
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, केवळ व्याजातूनच होईल ₹८२,००० ची कमाई; एकरकमी गुंतवणूक करावी लागणार
16
"हिंदुत्व ही कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा…’’, उद्धव ठाकरेंनी भाजपाला सुनावले
17
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला करा तुळशीचे 'हे' उपाय आणि पूजन, ते ठरेल इच्छापूर्तीचे साधन!
18
राज ठाकरेंचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर टीका, विजय सभेवर शिंदे गटाची प्रतिक्रिया, केलं असं भाकित
19
Raj Thackeray Udddhav Thackeray Family Photo : संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच व्यासपीठावर एकत्र... खास पोज देत काढला 'फॅमिली फोटो'
20
Viral Video : धबधब्यावर करत होते धमाल, अवघ्या ५ सेकंदात निसर्गानं दाखवली कमाल! व्हिडीओ व्हायरल

दारू विक्रेत्यांवरील कारवाईचा डेमो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 05:00 IST

पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देदिभना व खरपुंडी येथे जागृती : पुण्यातील लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सादर केले पथनाट्य

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारूविक्री केल्यास कुठली कारवाई होऊ शकते, यासाठी लोकांनी काय करायला हवे, याविषयी पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले.मुक्तिपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावातील दारुविक्री बंद करण्यासोबतच अहिंसक कृतीच्या माध्यमातून सातत्याने विक्रेत्यांचे दारूसाठे नष्ट केले जात आहेत. पोलिसांना याची माहिती देत विक्रेत्यांविरोधात तक्रारीही दाखल केल्या जात आहेत. विक्रेत्यांना कठोर शिक्षा होण्यासाठी पुरावे ठोस असण्यासोबतच पंचनामा व्यवस्थित होणे आणि पंच व साक्षीदार मजबूत असणेही आवश्यक आहे. अनेकदा गाव संघटनेद्वारे मोठ्या प्रमाणात दारूसाठा पकडूनही पंचनामा नीट न झाल्यास तक्रारी बळकट होत नाही. त्यातच पंच व साक्षीदारांना धमकावण्याचा प्रकारही घडतो. अशा वेळी गावातील नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, साक्षी पुरावे कसे बळकट करावे याविषयी पुण्याच्या विद्यार्थ्यांनी दोन गावांमध्ये पथनाट्य सादर केले. एखाद्या गावात दारू पकडल्यावर आधी पोलिसांना माहिती द्यावी. पोलीस आल्यावर कशा पद्धतीने पंचनामा होतो, प्रत्यक्ष कारवाई करणाऱ्या गावकऱ्यांनी साक्षीदार व पंच होणे का आवश्यक आहे, समन्स येणे, समन्स न आल्यास काय करावे, साक्षीदारांनी ठाम राहणे किती आवश्यक आहे, या सर्व बाबी पथनाट्यातून दाखविण्यात आल्या. गुन्हा सिद्ध झाल्यास विक्रेत्यांना काय शिक्षा होते हे देखील यातून सांगण्यात आले. शिक्षा अनेक विक्रेत्यांवर लगाम घालत असतो. त्यामुळे शिक्षा होणे आवश्यक आहे यावरही जागृती झाली. याप्रसंगी सुमेधा वालदे, प्रथमेश मंडलिक, प्राची दुतोंडे, सोहम जाधव आणि प्रतीक वाकडे यांचा सहभाग होता. मुक्तिपथ चमूतील रेवनाथ मेश्राम, दीक्षा सातपुते, गणेश कोलगिरे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Drunk And Driveड्रंक अँड ड्राइव्ह