गडचिरोली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना अहेरी अंतर्गत काही कामचुकार कर्मचारी मानसिक त्रास देत असल्याने कामात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी शीला चव्हाण यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.अहेरी येथील पर्यवेक्षिका कन्नाके यांच्याकडे विस्तार अधिकारी पदाचा प्रभार असलेल्या कालावधीतील कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रशासकीय कामे करताना अडचण निर्माण होत आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन खात्यात जमा होण्यास का विलंब झाला, याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपल्यावर खोटे आरोप लावले. त्याचबरोबर कनिष्ठ सहायक आर. आर. मडावी यांनी वेळोवेळी सूचना देऊनही आयकर, व्यवसाय कर भरलेला नाही. या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे.
कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
By admin | Updated: March 3, 2017 01:11 IST