शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात अपशब्द बोलणाऱ्या विरोधात मोठी कारवाई; पोलिसांनी उचललं!
3
पंतप्रधान मोदींना शिविगाळ, अपशब्द, भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, पाटण्यात तुफान राडा 
4
जालना हादरले! भीषण अपघातात विहिरीत पडलेल्या कारमधील चौघांचा मृत्यू
5
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
6
Ukrain Navy ship Video: युक्रेनवर रशियाचा 'प्रहार', मोठी युद्ध नौका उडवली, हल्ल्याचा व्हिडीओ समोर
7
टेस्ट ड्राइव्हच्या बहाण्याने दोन जण फॉर्च्यूनर घेऊन पळाले, सोबत गेलेल्या कर्मचाऱ्याला चालत्या गाडीतून फेकलं अन्...
8
Ganesh Chaturthi 2025: बाप्पाच्या सेवेनंतर तुम्हाला कधी 'असा' अनुभव आलाय का?
9
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
10
दोन दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात पुन्हा तेजी! 'या' सेक्टरने दिला सर्वाधिक आधार
11
Ratnagiri: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण जगबुडी नदीत बुडाले; एकाचा मृत्यू
12
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेंचा सरकारला इशारा!
13
विराटचं 'ते' वाक्य अन् मोहित सुरींना सुचला 'सैयारा'मधला 'तो' सीन, किंग कोहलीकडून मिळाली प्रेरणा
14
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
15
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
16
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
17
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
18
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
19
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला

गांधी वॉर्डात फवारणीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:30 IST

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून ...

गडचिरोली : स्थानिक गांधी वॉर्डात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने येथे फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या वाॅर्डात फवारणी करण्यात आली नाही. त्यामुळे येथे डासांची उत्पत्ती वाढली आहे. गांधी वॉर्डात दाट लोकवस्ती आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना नाल्या आहेत.

ग्रामीण भागातील वीज खांब धोकादायक

अहेरी : अहेरी तालुक्यासह जिल्हाभरात अनेक गावांत अनेक ठिकाणी वाकलेले खांब असून, ताराही लोंबकळत आहेत. यामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. त्यामुळे वाकलेले खांब व लोंबकळलेल्या तारा सुरळीत कराव्या, अशी मागणी होत आहे.

दुग्ध संस्थांना आर्थिक मदतीची मागणी

गडचिरोली : अपुऱ्या दूध पुरवठ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ६० पेक्षा अधिक दुग्ध सहकारी संस्था बंद पडल्या आहेत. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी दूध उत्पादन शेतकऱ्यांना आर्थिक मदत व मार्गदर्शनाची गरज आहे. मात्र, शासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात दूध उत्पादनाला बराच वाव असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

बसस्थानकातील वाहने नियंत्रणाविना

गडचिरोली : येथील बसस्थानक परिसरात प्रवासी, चालक व वाहकांची दुचाकी व चारचाकी वाहने ठेवण्यासाठी स्वतंत्र कडेकोट व्यवस्था नाही, तसेच शेडही नाही. त्यामुळे नागरिक वाहने अस्ताव्यस्त उभी करतात. पोलीस बंदोबस्ताअभावी बसस्थानक परिसरातील खासगी वाहने रात्री नियंत्रणाअभावी बेवारस राहतात.

शेतकऱ्यांना हस्तलिखित सात-बारा पुरावा

देसाईगंज : ऑनलाईन सात-बारा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सात-बारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ग्रामीण भागात वीज व इंटरनेटची समस्या सतत जाणवत असते. त्यामुळे हस्तलिखित सात-बारा पुरवावा, अशी मागणी होत आहे.

आरमोरीत सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा

आरमोरी : शहरात सार्वजनिक मुत्रीघर नसल्याने जनतेने स्वत:हून काही ठिकाणी अघोषित मुत्रीघर तयार केली आहेत. त्यामुळे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधणे आवश्यक आहे.

बीएसएनएलचे टॉवर वाढविण्याची

मागणी

आष्टी : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे जिल्ह्यात सर्वाधिक ग्राहक असून, जास्तीत-जास्त टॉवर उभारण्याची मागणी होत आहे.

शौचालयांची स्वच्छता करा

देसाईगंज : शासकीय कार्यालयांच्या शौचालयात फार मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना प्रचंड त्रास होत आहे. या शौचालयांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

चामोर्शीत कुशल मजुरांचा तुटवडा

चामोर्शी : विविध कुशल कामे करताना बांधकाम करण्यासाठी कुशल मजुरांची आवश्यकता आहे. मात्र, कुशल मजुरांची कमतरता आहे. तालुक्यातील अनेक गावांमध्ये दरवर्षी कुशल कामगारांचा तुटवडा जाणवतो.

पाणी टाकी परिसरातील सुरक्षा वाऱ्यावर

गडचिरोली : शुद्ध व पुरेसा पाण्याचा पुरवठा करण्यासाठी गावांमध्ये पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे; परंतु या टाकीच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासन गंभीर नसल्याने या टाकीच्या परिसरात घाण साचून राहत आहे.

‘प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या’

आरमोरी : पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले आरमोरी येथील प्राचीन महादेवगड आजही उपेक्षितच आहे. राज्य शासन पर्यटनस्थळांच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करीत आहे; परंतु आरमोरी येथील प्राचीन महादेवगडाला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यात आला नाही.

खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करा

गडचिरोली : खरपुंडी मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी केली आहे. मागील अनेक दिवसांपासून या मार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी आहे.

विनापरवानगी घरांचे बांधकाम

देसाईगंज : शहरात नगर परिषद प्रशासनाची परवानगी न घेताच दरवर्षी शेकडो घरे बांधली जात आहेत. या घरांवर नगर परिषद कोणतीही कारवाई करीत नसल्याने दरवर्षी विनापरवानगी बांधणाऱ्या घरांची संख्या शहरात वाढत चालली आहे.

सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा

अहेरी : दुचाकीच्या कर्णकर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवीत असल्याने वाहनांचा कर्कश आवाज ऐकावा लागत आहे.

गृहरक्षकांना पेन्शन लागू करण्याची मागणी

गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या ३० वर्षांपासून अनेक नागरिक गृहरक्षकपदावर काम करीत आहेत. गृहरक्षकांना १ एप्रिल २०१४ पासून ४०० रुपये मानधन देण्याचा निर्णय झाला; मात्र गृहरक्षकांना बारमाही रोजगार मिळत नाही. वर्षातून केवळ सहा महिनेच रोजगार दिला जातो. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.