शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

उद्योगांसाठी जागेची मागणी वाढली

By admin | Updated: October 15, 2016 01:46 IST

उद्योजकांना प्रशासनाकडून प्राधान्याने सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये सकारात्मक

गडचिरोली : उद्योजकांना प्रशासनाकडून प्राधान्याने सहकार्य केले जात आहे. त्यामुळे उद्योजकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी उद्योजकांची एमआयडीसीमध्ये जागेची मागणी वाढली आहे. उद्योजकांना जागा उपलब्ध व्हावी, यासाठी वाढीव जागेसाठी प्रयत्न करावा, असे निर्देश एमआयडीसी प्रशासनाला जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी दिले. एमआयडीसी संदर्भात असणाऱ्या विविध विषयांचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी गुरूवारी बैठकीदरम्यान घेतला. यावेळी एमआयडीसीचे विभागीय व्यवस्थापक जे. बी. संगीतराव, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक महेश परिहार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर उपस्थित होते. येणाऱ्या काळात रेल्वे आणि रस्त्यांचे जाळे विस्तारणार आहे. मुंबईत झालेल्या मेक इन महाराष्ट्रमध्येही गडचिरोली जिल्ह्यात उद्योग सुरू करण्याची तयारी अनेक उद्योजकांनी दर्शविली होती. या उद्योजकांकडून आता प्रत्यक्ष उद्योग स्थापण्याचे प्रयत्न सुरू झाले असून त्यामुळे जागेची मागणी वाढली आहे. स्थानिक उद्योजक सुद्धा जागेची मागणी करीत आहेत. उद्योजकांना जेवढी जागा आवश्यक आहे, तेवढी जागा एमआयडीसी प्रशासनाने उपलब्ध करून द्यावी, वाढीव जागेच्या प्रयत्नासाठी आपण सदैव मदत करू, असे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. एक महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योग मित्रांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणल्या होत्या. उद्योजकांचा सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेऊन प्रशासनाने सहकार्य करण्यास सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती. आष्टी येथे सध्या औद्योगिक वसाहत नाही. त्यामुळे त्या ठिकाणी वसाहतीची निर्मिती करण्याची तयारी एमआयडीसी प्रशासनाने करावी, अशा सूचना केल्या. औद्योगिक वसाहतीत जागा घेऊनही मुदतीत उद्योग उभारणीस सुरुवात केली नाही. त्यामुळे ४२ भूखंड परत घेण्याची कारवाई एमआयडीसीने केली आहे. त्यापैकी ४० भूखंडांचे वाटप नव्या उद्योजकांना करण्यात आले आहे, अशी माहिती औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक जे. बी. संगीतराव यांनी दिली. (नगर प्रतिनिधी) जिल्हाधिकाऱ्यांनी केली प्रत्यक्ष पाहणी ४जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांनी गुरूवारी एमआयडीसी परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रत्यक्ष भेटीदरम्यान एमआयडीसीला पुरविण्यात येणाऱ्या सोयीसुविधांविषयी उद्योजकांसोबत चर्चा केली. दळणवळण सुविधांचा विस्तार झाला तर एमआयडीसी झपाट्याने विकसित होईल, असा आशावाद नायक यांनी व्यक्त केला. भेटीदरम्यान उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसोबत सुद्धा चर्चा करून त्यांना उद्योजकांकडून देण्यात येणारी मजुरी, उपलब्ध सोयीसुविधांविषयी माहिती जाणून घेतली.