शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

कुरखेडात अचानक वाढली मिठाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:01 IST

सोमवारपर्यंत कुरखेडा येथील किराणा विक्रेत्यांकडे पुरेशा प्रमाणात मिठाचा साठा उपलब्ध होता. मात्र मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. या संधीचा गैरफायदा उचलत काही विक्रेत्यांनी चढत्या दरात मिठाची विक्री केली. मिठाचा तुटवडा भासणार नाही. नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये. तसेच विक्रेत्यांनीही छापील दरापेक्षा अधिकच्या दराने विक्री करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्या वतीने ध्वनीक्षेपकाने करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा/ धानोरा : छत्तीसगड राज्यात मिठाचा तुटवडा निर्माण झाला असल्याच्या माहितीवरून कुरखेडा बाजारपेठेत मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. त्यामुळे मीठ खरेदीसाठी अचानक नागरिकांची गर्दी वाढली आहे.सोमवारपर्यंत कुरखेडा येथील किराणा विक्रेत्यांकडे पुरेशा प्रमाणात मिठाचा साठा उपलब्ध होता. मात्र मंगळवारी अचानक मिठाची मागणी वाढली. या संधीचा गैरफायदा उचलत काही विक्रेत्यांनी चढत्या दरात मिठाची विक्री केली. मिठाचा तुटवडा भासणार नाही. नागरिकांनी अनावश्यक साठा करू नये. तसेच विक्रेत्यांनीही छापील दरापेक्षा अधिकच्या दराने विक्री करू नये, असे आवाहन नगर पंचायतीच्या वतीने ध्वनीक्षेपकाने करण्यात आले.चातगावात मीठ खरेदीसाठी वाहनांच्या रांगामिठाचा तुटवडा निर्माण होणार असल्याची अफवा धानोरा तालुक्यातही निर्माण झाली. त्यामुळे धानोरा, मुरूमगाव, चातगाव येथील दुकानदारांकडे मीठ खरेदीसाठी नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. एक व्यक्ती ३० किलो वजनाच्या दोन बॅग खरेदी करीत होता. विशेष म्हणजे, अधिकचे पैसे देऊन ग्राहक मीठ खरेदी करीत होते. चातगाव येथील एका ठोक व्यापाऱ्याकडे मीठ खरेदीसाठी दुकानदारांच्या गाड्या लागल्या होत्या. मुरूमगाव येथे मंगळवारी आठवडी बाजार होता. बाजारात येणारे नागरिकही इतर साहित्य न नेता मिठाच्या मोठ्या बॅग धरून जात होते. याबाबत धानोरातील दुकानदारांना विचारणा केली असता, मिठाची टंचाई अजिबात नाही. मात्र नागरिकांमुळे मिठाची कृत्रीम टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तविली.मिठाचा तुटवडा नाहीगुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातून रेल्वेद्वारे गोंदिया व देसाईगंज येथे मिठाचा पुरवठा होतो. त्यानंतर ट्रकद्वारे एजन्सीधारकांना मिठाचा पुरवठा केला जाते. जिल्ह्यात मिठाचा तुटवडा नाही. अचानक मागणी वाढल्याने मिठ संपले आहे. नागरिकांनी अनावश्यक मिठाचा साठा करू नये. बाजारपेठेत लवकरच मीठ उपलब्ध होईल, अशी माहिती कुरखेडा येथील किराणा व्यावसायिक विवेक निरंकारी यांनी दिली.