शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

कनिष्ठ प्राध्यापकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:23 IST

कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विजुक्टा) व महासंघाच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या : सरकारच्या शैक्षणिक धोरणावर व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी विदर्भ ज्युनियर कॉलेज टिचर्स असोसिएशन (विजुक्टा) व महासंघाच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त विद्यमाने शुक्रवारी जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी उच्च माध्यमिक शिक्षकांनी शासनाच्या धोरणाचा निषेध केला.यावेळी विजुक्टाच्या केंद्रीय कार्यकारीणीचे कोषाध्यक्ष प्रा. सूर्यकांत भोंगळे, गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. भाऊराव गोरे, प्रा. प्रकाश शिंदे, सचिव धर्मेंद्र मुनघाटे, प्रा. कुत्तरमारे, प्रा. अशोक जुआरे, प्रा. जी. एल. तुमपल्लीवार, प्रा. डी. एच. टेपलवार, प्रा. एन. बी. उरकुडे, प्रा. एच. जी. खाडे, प्रा. डी. बी. सोमनकर, प्रा. व्ही. एस. जुआरे, प्रा. नंदकिशोर मेनेवार, प्रा. प्रदीप बोडणे, प्रा. अरूण बुरे, प्रा. सुनिल ढेंगळे, प्रा. चंद्रशेखर कापकर आदीसह जिल्ह्यातील बहुसंख्य उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.मागील चार-पाच वर्षांपासून नियुक्त झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना नियुक्ती मान्यता नाही. काही जणांना मान्यता मिळाली. मात्र शालार्थ प्रणाली सुरू न केल्यामुळे मागील तीन वर्षांपासून वेतन मिळाले नाही. १ नोव्हेंबर २००५ पासून राज्यात नवीन अंशदायी परिभाषीत पेन्शन योजना लागू केली. त्यानुसार शिक्षकांच्या वेतनातून १० टक्के रक्कम कपात केली. मात्र या पेन्शन योजनेचा लाभ शिक्षकांना मिळाला नाही. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याची परवानगी दिली जात नाही. त्यामुळ हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. या सर्व समस्या शासनाने निकाली काढाव्यात, अशी मागणी विजुक्टाने केली आहे. मागण्यांचे निवेदन शिक्षणाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी साई कोंडावार यांनी स्वीकारले. हे निवेदन शिक्षणमंत्र्यांना पाठविण्यात आले.