शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, अश्वगंधाच्या राेपांना मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:38 IST

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती ...

गडचिराेली : काेराेनाच्या संकटकाळात बहुतांश नागरिक आपल्या आराेग्याकडे विशेष लक्ष देत आहेत. काेराेनाचा संसर्ग हाेऊ नये, याकरिता राेगप्रतिकार शक्ती वाढविण्यावर भर देत आहेत. त्याअनुषंगाने रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या तुळस, पुदीना, अद्रक, अश्वगंधा व गुळवेल आदी औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांना मागणी वाढली आहे.

प्राचीन काळापासून आयुर्वेदात विविध वनस्पतींचे विविध गुण व महत्त्व विशद करण्यात आले आहे. वनविभागासह अनेक जाणकार नागरिक आपल्या घरी तुळस, पुदिना, अद्रक, अश्वगंधा, गुळवेलसह विविध औषधी गुणधर्म असणाऱ्या राेपांची लागवड करीत असल्याचे दिसून येते. गडचिराेली शहरातील बऱ्याच घरी विड्याच्या पानांची राेपटी दिसून येतात. एकूणच या वनाैषधीचा विविध आजारांवर उपयाेग केला जाताे.

काेट...

काेराेना महामारीच्या पहिल्या लाटेत काही नागरिकांनी आमच्याकडील विविध प्रकारची वनाैषधी नेली. आता दुसऱ्या लाटेत वनस्पतीचा उपयाेग करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमच्या अंगणात वनस्पतीची लागवड करण्यात आली आहे. घरच्या सदस्यांना कुठलाही आजार झाला की आम्ही प्राथमिकस्तरावर वनाैषधीचा उपयाेग करताे. प्रत्येकाच्या घरी वनाैषधीची झाडे असावीत.

- भाऊराव किरंगे, नागरिक

सध्या काेराेनावर कुठलेच रामबाण औषध नाही. गडचिराेली जिल्ह्यात आपल्या आजूबाजूला विविध प्रकारच्या वनाैषधी आहेत. विविध आजारांसाठी जाणकारांच्या सल्ल्यानुसार गुळवेल, अश्वगंधा, कुड्याचे फूल व इतर वनाैषधीचा रस याेग्य प्रमाणात घेतल्यास लाभ हाेताे. नागरिकांनी वनाैषधीची लागवड करून झाडे जगविली पाहिजेत. आयुर्वेदिक वनाैषधी लागवडीचे प्रमाण वाढविणे गरजेचे आहे.

- मिलिंद उमरे, वनाैषधी अभ्यासक

बाॅक्स...

हे आहेत वनस्पतीतील औषधी गुणधर्म

तुळस : तुळशीची झाडे घरामध्ये किंवा अंगणात लावल्याने डास आणि किडे घरामध्ये येत नाही. राेज तुळशीची पाने खाल्ल्याने माणसाच्या शरीरातील रक्त शुद्ध हाेते. सर्दी, खाेकला घालविण्यासाठी चहामध्ये तुळशीचे पाने टाकून पितात.

अश्वगंधा : शरीरातील ताकद वाढविण्यासाठी अश्वगंधा वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. आयुर्वेदिक औषधी बनविण्याकरिता तसेच गुडघे दुखणे, खाेकला, अस्थमा या आजारावर सदर वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

पुदिना : उन्हाळ्यामध्ये गरम हवेपासून बचाव करण्याकरिता सरबत म्हणून पुदिना वनस्पतीचा उपयाेग केला जाताे. याचे सेवन केल्याने पाेटदुखी कमी हाेते. त्वचेशी संबंधित आजारासाठी पुदिना लाभदायक ठरताे. मिरची, हिंग, जिरे व पुदिना याचे मिश्रण केल्याने उलट्या थांबतात. याशिवाय लहान बालकांच्या छाेट्या-माेठ्या आजारासाठी या वनस्पतीचा उपयाेग केला जाताे.

गुळवेल : गुळवेल वनस्पती अनेक आजारावर गुणकारी आहे. जीर्ण ताप व सर्व प्रकारच्या तापानंतर येणारा अशक्तपणा, वाताचा त्रास, तहान-तहान होणे, रोग प्रतिकारक शक्ती कमी असल्याने वारंवार आजारपण येणे, भूक न लागणे, मंदावणे, कावीळसाठी वापरतात.

अद्रक : पाचन विकारासाठी अद्रक अत्यंत लाभदायक आहे. सर्दी, खाेकला, पाेटात गॅस हाेणे आदींसाठी अद्रकचा रस उपयुक्त ठरताे. श्वसन विकार, महिलांच्या विविध आजारांवर अद्रक उपयुक्त आहे. वेदना कमी करण्यासाठी अद्रकचा उपयाेग केला जाताे.