शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

अन्यायकारक शैक्षणिक निर्णय रद्द करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:38 IST

शासनाकडून घेण्यात येत असलेल्या अन्यायकारक निर्णयांमुळे शैक्षणिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शासनाने सदर निर्णय बदलवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देशिक्षक परिषद संटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन : मराठी माध्यमांच्या शासकीय शाळा बंद करू नका

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शासनाकडून घेण्यात येत असलेल्या अन्यायकारक निर्णयांमुळे शैक्षणिक व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शासनाने सदर निर्णय बदलवावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यीत शाळा अधिनियम राज्यशासनाने केला आहे. या अधिनियमाच्या अंमलबजावणीमुळे शिक्षण क्षेत्रातील मुळ शिक्षण व्यवस्था खिळखिळी झाली आहे. शिक्षण व्यवस्थाच उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. राज्यातील मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत चालल्या आहेत. नुकत्याच १ हजार ३१४ प्राथमिक शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सुमारे १२ हजार शाळा बंद करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. २० डिसेंबर २०१७ रोजी अधिनियम मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये कंपन्यांना शाळा काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षणाचे व्यावसायीकरण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यमान शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी अर्जाची छाननी करण्याची पद्धत सुलभ करावी, वर्षभर आॅनलाईन अर्ज सादर करण्यासाठी परवानगी द्यावी, राज्यस्तरावर व क्षेत्रीय स्तरावर प्राधिकाºयांच्या नियुक्तीसाठी कार्यपद्धती विहित करावी, महानगरपालिका व ‘अ’ दर्जाच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये नवीन शाळा स्थापन करण्यासाठी जागेचे क्षेत्र कमी करावे.शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाºयांच्या नियुक्तीसाठी होणारा भ्रष्टाचार दूर करावा. विद्यार्थ्यांकडून वसूल केल्या जाणाºया देणगी व इतर शुल्कांवर निर्णय घ्यावा आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देतेवळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष (माध्यमिक) संतोष सुरावार, जिल्हा कार्यवाह गोपाल मुनघाटे, अध्यक्ष (प्राथमिक) अविनाश तालापल्लीवार, उपाध्यक्ष यशवंत शेंडे, संघटन मंत्री सुरेश धुडसे, कार्यालय मंत्री सुरेंद्र धकाते, एस. पी. मेश्राम उपस्थित होते.व्यावसायिकीकरणाचा धोकाराज्य शासनाने कार्पोरेट कंपन्यांना शाळा उघडण्याची परवानगी दिली आहे. या कंपन्या शैक्षणिक धोरणाचे पूर्णपणे व्यावसायिकीकरण करण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय मागे घेण्यात यावा, यासाठी शिक्षक परिषदेने शासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे.