शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

शहीद कुटुंबांना मदतीचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 00:23 IST

कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत २८ मे रोजी वितरित करण्यात आली.

ठळक मुद्दे१ कोटी ८ लाख मंजूर : ५० लाख ५० हजारांचे वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरूंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. शहिदांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५० लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत २८ मे रोजी वितरित करण्यात आली.अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, अजयकुमार बन्सल यांच्या हस्ते शहिदांच्या कुटुंबियांना ही मदत वितरित करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला १ कोटी ८ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यापैकी ५० लाख ५० हजार रुपये वितरित करण्यात आले. या मदतीसोबतच शहीद जवान सेवानिवृत्त होण्याच्या कालावधीपर्यंत पूर्ण वेतन त्याच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे. तसेच कुटुंबातील एका वारसास शिक्षण पात्रतेनुसार शासकीय नोकरी सुध्दा दिली जाईल, अशी माहिती अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी दिली.शहीद पोलीस कुटुंबियांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी पोलिसांचा परिवार त्यांच्या पाठीशी राहून मदत करेल, असे आश्वासन राज्याचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांनी दिले आहे. उर्वरित मदत सुध्दा लवकरच देण्याचे आश्वासन अपर पोलीस महासंचालकांनी दिले.वाहन चालकाच्या कुटुंबालाही मदतया घटनेतील मृत खासगी वाहनाचा चालक तोमेश्वर सिंगनाथ यांच्या पत्नीला दोन लाख रुपये व आई-वडिलांना ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. वाहन मालक गहाणे यांनाही एक लाख रुपये वितरित करण्यात आले. घटनेच्या दुसऱ्या दिवशी तोमेश्वर सिंगनाथ यांच्या आई-वडिलांना ५० हजार रुपये देण्यात आले होते. आतापर्यंत तोमेश्वरच्या कुटुंबियांना तीन लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे. शासनाकडूनही आर्थिक मदत मिळावी, यासाठीचा प्रस्ताव पाठविला आहे. गडचिरोली पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनातूनही काही रक्कम गोळा करून तोमेश्वरच्या कुटुंबियांना दिली जाईल, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी