शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयाच्या आदेशाने लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित

By admin | Updated: February 11, 2017 01:50 IST

जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

आरमोरी : जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित करावे, असे आदेश दिल्यानंतर निवडणूक विभागाने त्यांना निवडणूक चिन्ह शुक्रवारी वितरित केले. उमेदवारी अर्जासोबत लक्ष्मी मने यांनी जो शौचालयाचा प्रमाणपत्र सादर केला आहे, त्या प्रमाणपत्रावर शौचालय वापरत असल्याबाबतचा उल्लेख नसल्याच्या कारणावरून जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरविला होता. या निर्णयाविरोधात लक्ष्मी मने यांनी उच्च न्यायालयात शुक्रवारी रिट याचिका दाखल केली. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी करताना उच्च न्यायालयाने लक्ष्मी हरीष मने यांना निवडणूक चिन्ह वितरित करण्याचे निर्देश निवडणूक विभागाला दिले. लक्ष्मी मने यांची याचिका १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता सुनावणीसाठी ठेवण्यात येईल. रिठ याचिकेतील अंतिम निर्णयाच्या अधिन राहून लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित करण्यात येत असल्याचे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाचे सहायक सरकारी वकील निरज पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दुपारी १.४५ वाजता भ्रमणध्वनीद्वारे याबाबतची माहिती दिली व निवडणूक चिन्हाचे वितरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कार्यवाही करीत लक्ष्मी मने यांना निवडणूक चिन्ह वितरित केला आहे. १४ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे मतदार व नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)