शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
3
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
4
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
5
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
6
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
7
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
8
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
9
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
10
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
11
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
12
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
13
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
14
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
15
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
16
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
17
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
18
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
19
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
20
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!

मेडिकल कॉलेज आणि रेल्वेसाठी शिष्टमंडळाचे राज्यपालांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 05:00 IST

अतिदुर्गम, मागास, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मेडिकल कॉलेजची नितांत आवश्यकता आहे. राज्य शासनाकडून मेडिकल कॉलेज निर्मितीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर न केल्याने हा प्रश्न रखडलेला आहे. त्यामुळे शासनाला तसे निर्देश द्यावे, अशी मागणी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देखासदारांच्या नेतृत्वात चर्चा; केंद्राकडे प्रस्ताव पाठविण्याची विनंती

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोलीत शासकीय मेडिकल कॉलेजला मंजुरी आणि वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी राज्य शासनाचा ५० टक्के वाटा मिळण्यासाठी जिल्ह्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांना साकडे घातले. खासदार अशोक नेते यांच्या नेतृत्वात नागपूर येथे ही भेट झाली.यावेळी भाजपचे ओबीसी मोर्चाचे पूर्व विदर्भ संपर्कप्रमुख बाबूरावजी कोहळे, गडचिरोली जि.प.चे कृषी सभापती रमेश बारसागडे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, सुरेश  राठोड  प्रामुख्याने  उपस्थित  होते.अतिदुर्गम, मागास, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मेडिकल कॉलेजची नितांत आवश्यकता आहे. राज्य शासनाकडून मेडिकल कॉलेज निर्मितीचा प्रस्ताव केंद्राकडे सादर न केल्याने हा प्रश्न रखडलेला आहे. त्यामुळे शासनाला तसे निर्देश द्यावे, अशी मागणी यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली आहे. यासोबतच वडसा-गडचिरोली हा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग मंजूर होऊन अनेक वर्षे लोटली, मात्र राज्य शासनाने याकरिता आपल्या वाट्यातील ५० टक्के निधी न दिल्यामुळे या मार्गाचे बांधकाम अजूनही सुरू होऊ शकलेले नाही. या मार्गासाठी लागणाऱ्या जमिनीच्या हस्तांतरणाची कार्यवाही ९० टक्के पूर्ण झाली आहे, मात्र निधीअभावी हा मार्ग रखडलेला असल्याचे सदर शिष्टमंडळाने राज्यपालांना सांगितले. या रेल्वे मार्गाचे काम सुरू करण्यासाठी राज्य शासनाला आपल्या वाट्यातील ५० टक्के निधी देण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी राज्यपालांकडे केली.

विलंबामुळे किंमत वाढलीवडसा-गडचिरोली हा रेल्वे मार्ग २०११ मध्ये मंजूर झाला, मात्र वने व पर्यावरण विभागाच्या भूसंपादनाच्या  अडसरामुळे निर्माणकार्य सुरू होऊ शकले नाही. दरम्यान, मूळ किमतीमध्ये वाढ होऊन एकूण किंमत १०९६ कोटी रुपये इतकी झाली आहे. यापैकी ५० टक्के वाटा म्हणजेच ५४८ कोटी रुपये देण्याची हमी राज्य शासनाने २०१६-१७ मध्ये दिली होती. मात्र अजूनही निधी आवंटित केलेला नाही. तसेच वाढीव किमतीनुसार नव्याने स्वीकृतीही राज्य शासनाने दिलेली नाही, असेही खासदार अशोक नेते यांनी यावेळी सांगितले.

 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीAshok Neteअशोक नेते