शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

हागणदारीमुक्तीत देसाईगंज तालुका जिल्ह्यात प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 23:33 IST

देसाईगंज तालुक्याने १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करून हागणदारी मुक्तीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील पहिला तालुका : १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट गाठले

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज तालुक्याने १०० टक्के शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट पूर्ण करून हागणदारी मुक्तीत जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे.निर्मल भारत अभियानांतर्गत २०१२ मध्ये या तालुक्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यावेळी १९ ग्रामपंचायतीमध्ये १२ हजार ९१५ कुटुंब होते. त्यातील ७ हजार २८ कुटुंबाकडे शौचालय नसल्याने त्यांना शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते. मागील तीन वर्षात तालुक्यातील कुटुंबांच्या भेटी घेऊन, स्वच्छता अभियान, नारळफोड कार्यक्रम, ग्रामपंचायत पदाधिकाºयांच्या वारंवार कार्यशाळा व सदैव गावात भेटी व शालेय प्रभातफेरी घेऊन ३१ मार्च २०१७ पर्यंत तालुका ९० टक्के हागणदारी मुक्त झाला. याबाबत १ मे २०१७ रोजी महाराष्टÑ दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कारही करण्यात आला. पुन्हा मागील तीन महिन्यात राहिलेले १० टक्के शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले आहे. आता या तालुक्यात १०० टक्के कुटुंबांकडे शौचालय उपलब्ध झाले असून सदर तालुका हागणदारीमुक्त झाला आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगरे, सभापती मोहन गायकवाड, उपसभापती गोपाल उईके, सहायक गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोल्हे, विस्तार अधिकारी उमेशचंद्र चिलबुले, गट समन्वयक स्वाती लांजेवार, समुह समन्वयक अर्चना बडोले, केशव लोखंडे यांच्यासह देसाईगंज तालुका हागणदारीमुक्त करण्यासाठी तालुक्यातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य, शिक्षक, ग्रामरोजगार सेवक, नरेगा कर्मचारी, स्वच्छ भारत मिशनचे कर्मचारी, पंचायत समितीमधील अधिकारी, कर्मचारी यांनी नियोजनबध्द शौचालय बांधकामाचा उपक्रम राबविला. त्यामुळे इतर तालुक्यांना मागे टाकत देसाईगंज तालुक्याने हागणदारी मुक्तीकडे वाटचाल केली आहे. यापासून इतर तालुक्यांनी प्रेरणा घेण्याची गरज आहे.