शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या डोसला उशीर झाला? काळजीचे कारण नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्करला, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. एकूण ७२ केंद्रांवरून सुरू असलेल्या लसीकरणासाठी आता नागरिक झुंबड करीत असल्याने केंद्रांवर पोहोचलेला लसींचा साठा दोन दिवसांतच संपून जात आहे. परिणामी, लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे. 

ठळक मुद्देसाठा संपल्याने अनेक जण वंचित, काय हाेणार याचीच चिंता

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाचे वाढलेले प्रमाण आणि पटापट होणारे मृत्यू पाहून अनेकांना आता लस घेण्याची घाई झाली आहे. मात्र लसींचा पुरवठा पाहिजे त्या प्रमाणात होत नसल्याने लसीकरणात अधूनमधून खोळंबा येत आहे. त्यातच पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसची वेळ आलेल्यांचा जीव टांगणीला लागला आहे. पण, त्यात खूप काळजीचे किंवा घाबरण्याचे कारण नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.जिल्ह्यात सर्वप्रथम फ्रंटलाईन वर्करला, त्यानंतर ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना, ४५ वर्षांवरील नागरिकांना आणि आता १८ वर्षांवरील सर्वांना लसीचा पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. एकूण ७२ केंद्रांवरून सुरू असलेल्या लसीकरणासाठी आता नागरिक झुंबड करीत असल्याने केंद्रांवर पोहोचलेला लसींचा साठा दोन दिवसांतच संपून जात आहे. परिणामी, लसीकरण थांबविण्याची वेळ येत आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतरही आणि आपला नंबर लागलेला असतानाही लस मिळत नसल्याने काही लोक तीव्र नाराजीही व्यक्त करताना दिसतात. विशेषत: ज्यांनी पहिला डोस घेतला आहे आणि आता दुसरा डोस घेण्याची वेळ आली आहे असे लोक अधिक काळजी करताना दिसतात. दुसरा डोस वेळेत घेतला नाही, तर पहिला डोस निष्प्रभ ठरणार का? आपल्याला कोरोनाची लागण होणार का, असे प्रश्न त्यांच्या मनात उठत आहेत. मात्र दुसरा डोस घेण्यास उशीर झाला तरी कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असा दिलासा अधिकाऱ्यांंनी दिला आहे.

२४ हजार लस उपलब्ध १८ वर्षांवरील युवकांचे लसीकरण सुरू झाल्याने लसीकरणासाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे उपलब्ध लसी लवकरच संपत आहे.काही ठिकाणच्या केंद्रांवर लसीचा साठा नसल्यामुळे ते केंद्र लसीकरणासाठी बंद ठेवण्याची वेळ आली होती. मात्र बुधवारी २४ हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. १८ ते ४४ वयोगटासाठी अजून ५ ते ६ लसीकरण केंद्रे लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील गर्दीही कमी होईल.

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस