शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरूचा ठराव देण्यास ग्रामपंचायतींकडून विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 05:00 IST

दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत.

ठळक मुद्देभेंडाळा परिसरातील विद्यार्थ्यांचे हाेत आहे नुकसान

राेशन थाेरातलाेकमत न्यूज नेटवर्कभेंडाळा : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा येथील विश्वशांती विद्यालयात परिसरातील फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या गावांमधील विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेेने या ग्रामपंचायतींकडून शाळा सुरू करण्यासंबंधी ठरावाची मागणी केली आहे.  मात्र,  देण्यास दिरंगाई होत असल्याचे दिसून येत आहे. विशेष बाब अशी की, या ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या महिन्याभरात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दीड वर्षापासून शाळा बंद आहेत, त्यामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम हाेत आहे. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग नियमांचे पालन करून, १५ जुलैपासून सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शाळा सुरू करण्यास ग्रामपंचायतीचा ठराव, पालकांची परवानगी व त्या गावांतील कोरोनाची स्थिती याचा आढावा घेऊन शाळा सुरू करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. त्या अनुषंगाने विश्वशांती विद्यालयाने शाळा सुरू करण्यासाठी दि. १२ जुलैला फराडा, मोहुर्ली, मार्कंडा, नवेगाव, वाघोली या ग्रामपंचायतीकडे ठरावाच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, पण आता पंधरा दिवस झाले, या ग्रामपंचायतीने अजूनही ठराव दिला नसल्याने, त्या गावांतील विद्यार्थी प्रत्यक्षात अजूनही शाळेत येऊ शकत नाही. शाळेचे मुख्याध्यापक यांनी अनेक वेळा भ्रमणध्वनीद्वारे आणि प्रत्यक्ष जाऊन ठराव घेण्याविषयी विनंती केली. मात्र, अजूनपर्यंत ठराव घेण्यात आला नाही.

जिल्हाभरातही हीच स्थितीशासनाने आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये अनेक गावचे विद्यार्थी येतात. ज्या गावचे विद्यार्थी आहेत, त्या गावाच्या ग्रामपंचायतीची संमती असणे आवश्यक आहे. मात्र अनेक ग्रामपंचायतींनी अजूनपर्यंत ठरावच घेतले नसल्याने त्या गावातील विद्यार्थी शाळेपासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी लवकर ठराव घेण्याची गरज आहे. 

पहिले ते सातवीचेही वर्ग सुरू करण्याची जाेर धरताहे मागणी

- जिल्हा व राज्यभरात काेराेना रुग्णांची संख्या कमालीची घटली आहे. गडचिराेली जिल्ह्यात केवळ आता ७० रुग्ण उपचार घेत आहेत. काेराेनामुळे मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. पहिलीच्या विद्यार्थ्यांनी तर अजूनपर्यंत शाळाच बघितली नाही.- काेराेनाचा प्रभाव प्रामुख्याने शहरी भागात दिसून येते. ग्रामीण भागात काेराेनाचा फारसा प्रसार झाला नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नाही. काही हाेतकरू शिक्षक विद्यार्थ्यांना शाळेत बाेलावून शिकवत आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाgram panchayatग्राम पंचायत